महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Doctors Strike In Nagpur नागपुरातील निवासी डॉक्टर संपावर, मेडीकल, मेयोतील 900 डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णसेवा बाधित

राज्यभरातील निवासी डॉक्टर आपल्या विविध मागण्यांसाठी आज सकाळपासून संपावर गेले आहेत. नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ( Government Medical College Nagpur ) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ( Indira Gandhi Government Medical College Nagpur ) या दोन महाविद्यालयातील 9 डॉक्टरांनी या संपात सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे ओपीडी बंद असून निवासी डॉक्टर ( Resident Doctors Strike In Nagpur )आकस्मिक वैद्यकीय सेवा विभागाच्या समोर घोषणाबाजी करत आहेत.

Doctors Strike In Nagpur
निवासी डॉक्टर संपावर

By

Published : Jan 2, 2023, 5:09 PM IST

Updated : Jan 2, 2023, 5:36 PM IST

नागपूर -विविध मागण्यांसाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ( Government Medical College Nagpur ) आणि मेयो रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. त्यामुळे आरोग्य सेवा प्रभावित ( Medical And Mayo Hospital OPD Closed ) झाल्याचे बघायला मिळत आहे. नागपूर शहरात दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत. त्यामध्ये साधारणतः 900 निवासी डॉक्टर कार्यरत ( Resident Doctors Strike In Nagpur) आहेत. मात्र हे निवासी डॉक्टर संपावर गेल्यामुळे रुग्णसेवा बाधित झाली आहे.

नागपुरातील निवासी डॉक्टर संपावर

डॉक्टर्स संपावर गेल्याने रुग्णसेवा बाधितराज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ( Doctor Went On Strike In Nagpur ) आणि रुग्णालयात नवीन वसतीगृह बांधून द्या, एक वर्षाच्या शासकीय बाँड बद्दलच्या अटीचा पुनर्विचार करा, वैद्यकीय शिक्षण महाविद्यालयात शिक्षकांची भरती करा, निवासी डॉक्टरांना सातव्या वेतन आयोगाच्या दर्जानुसार विद्या वेतन द्या, अशा अनेक मागण्या पुढे करत आज राज्यभरातील निवासी डॉक्टर्स बेमुदत संपावर गेले आहेत. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि रुग्णालयात 585 निवासी डॉक्टर्स संपावर गेल्याने रुग्णसेवा बाधित झाली आहे.

मेयो, मेडिकलमध्ये रुग्णसेवा बाधितआज सकाळपासूनच सर्व निवासी डॉक्टर रुग्णालयाच्या ( Government Medical College Nagpur ) आत गेले नाहीत. डॉक्टर आकस्मिक वैद्यकीय सेवा विभागाच्या समोर घोषणाबाजी करत आंदोलन करत आहेत. नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ( Indira Gandhi Government Medical College Nagpur ) आणि रुग्णालयात 350 निवासी डॉक्टर्स संपात उतरले आहेत. त्यामुळे नागपुरातील दोन्ही शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रुग्णसेवा ( Doctor Went On Strike In Nagpur ) बाधित होत आहे. जोवर शासन आमच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करत नाही, तोवर फक्त आकस्मिक सेवा सोडून इतर कुठलीही रुग्णसेवा आम्ही देणार नसल्याचा निर्धार आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

Last Updated : Jan 2, 2023, 5:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details