नागपूर - गेल्या काही महिन्यांपासून नागपूर महानगरपालिकेत सत्ताधारी, विरोधक विरुद्ध महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे असा सामना रंगला आहे. दोन्ही गटात शीतशुद्ध पेटले असताना आज पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या वाढदिवसानिमित्त महापौर संदीप जोशी यांनी थेट पालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे नागपुरकरांना सुखद धक्का बसला आहे.
महापौर संदीप जोशींनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट, वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा - Municipal Commissioner Tukaram Mundhe
कोरोनाचे संकट डोक वर काढत असताना पालिका आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे रुजू झाले. तेव्हापासून सत्ताधारी पक्ष आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात शीतयुद्ध पेटले आहे.
कोरोनाचे संकट डोक वर काढत असताना पालिका आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे रुजू झाले. तेव्हापासून सत्ताधारी पक्ष आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात शीतयुद्ध पेटले आहे. त्यात विरोधक सुद्धा सत्ता पक्षाच्या सोबत गेल्याने नागपूरकर जनतेचा आयुक्तांना पाठिंबा वाढला आहे. त्यातच आज आयुक्त तुकाराम मुंढे यांचा वाढदिवस असल्याने सर्व वाद बाजूला सारून महापौर संदीप जोशी यांनी थेट आयुक्तांचे कार्यालय गाठून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या दोघांच्या भेटीत काही मुद्यांवर चर्चा देखील झाली असण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, त्यामुळे येत्या काळात मतभेद बाजूला सारून कोरोनाच्या संदर्भात एकजुटीने काम होईल, अशी अपेक्षा सामान्य नागपूरकर करत आहेत.