महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

२७ महापालिकेसाठी महापौर आरक्षण जाहीर, १६ शहरांमध्ये खुल्या वर्गातील महापौर - २७ शहरांसाठी महापौर यादी

नगरविकास खात्याच्या सचिव मनिषा म्हैसकर यांनी महापौर पदासाठी आरक्षण यादी घोषित केली आहे. त्यानुसार १६ शहरांमध्ये खुल्या वर्गाचे महापौर राहणार आहेत. तर उरलेल्या शहरांमध्ये इतर वर्गातील उमेदवारांना आरक्षण देण्यात आले आहे.

२७ महापालिकेसाठी महापौर आरक्षण जाहीर

By

Published : Nov 13, 2019, 4:33 PM IST

Updated : Nov 13, 2019, 7:49 PM IST

मुंबई- महापालिकेसाठी काही महिन्यात निवडणुका घेण्यात येतील. त्यामुळे राज्यातील 27 महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. त्यानुसार १६ शहरांमध्ये खुल्या वर्गाचे महापौर राहणार आहेत. तर उर्वरित शहरांमध्ये इतर वर्गातील उमेदवारांना आरक्षण देण्यात आले आहे.

२७ महापालिकेसाठी महापौर आरक्षण जाहीर

बृहन्मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह इतर महानगरपालिकांचे महापौर, उपमहापौर तसेच पदाधिकारी, नगरविकास विभागाचे सहसचिव पांडुरंग जाधव, अपर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे, कक्ष अधिकारी निकीता पांडे, महानगरपालिकांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. महापौर, सहसचिव जाधव तसेच महानगरपालिकांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून महापौरपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. विशेषत: प्रवर्गातील महिला आरक्षणाच्या सोडती महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते काढण्यात आल्या.

प्रारंभी आरक्षण सोडतीबाबतच्या तरतुदी सांगण्यात आल्या. आरक्षण सोडत नियम 2017 मधील तरतुदीनुसार या सोडत काढण्यात आल्या. अनुसूचित जमातीचे आरक्षण सोडत काढताना 2007 पासून अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या महानगरपालिकांना सोडतीतून वगळण्यात आले. तसेच इतर संवर्गासाठी आरक्षण सोडत काढताना सध्या त्या संवर्गाचे आरक्षण असलेल्या महापालिकांना वगळण्यात येऊन अन्य महापालिकांतून आरक्षण काढण्यात आले.

कोणत्या शहरात कोणत्या वर्गाचे महापौर -

  • शहर वर्ग
  1. मुंबई खुला
  2. पुणे खुला
  3. नागपूर खुला
  4. ठाणे खुला
  5. नाशिक खुला
  6. नवी मुंबई खुला महिला
  7. पिंपरी चिंचवड खुला महिला
  8. औरंगाबाद खुला महिला
  9. कल्याण डोंबिवली खुला
  10. वसई विरार अनुसूचित जमाती
  11. मिरा भाईंदर अनुसुचित जाती
  12. चंद्रपूर खुला महिला
  13. अमरावती मागास प्रवर्ग
  14. पनवेल खुला महिला
  15. नांदेड मागास प्रवर्ग महिला
  16. अकोला खुला महिला
  17. भिवंडी खुला महिला
  18. उल्हासनगर खुला
  19. अहमदनगर अनुसूचित जाती (महिला)
  20. परभणी अनुसूचित जाती (महिला)
  21. लातूर मागास प्रवर्ग सर्वसाधारण
  22. सांगली खुला
  23. सोलापूर मागास प्रवर्ग महिला
  24. कोल्हापूर मागास प्रवर्ग महिला
  25. धुळे मागास प्रवर्ग सर्वसाधारण
  26. मालेगाव मागास प्रवर्ग महिला
  27. जळगाव खुला महिला
Last Updated : Nov 13, 2019, 7:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details