नागपूर- भारतीय सैन्यदलात सैनिक पदावर कार्यरत असलेले काटोलचे सुपुत्र राकेश देवीदास सोनटक्के यांच्यावर आज काटोल येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राकेशला युद्धसरावादरम्यान ईजा झाली होती. त्यानंतर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला होता.
२० दिवसापूर्वी आसामच्या डिंगजाम येथे युद्धसराव करीत असताना राकेश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. प्राथमिक उपचारानंतर राकेशला कोलकाता येथील आर्मी कमांड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. येथे राकेशची प्रकृती सुधारण्याऐवजी आणखीणच खालावत गेली. अखेर रविवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.