नागपूर - राज्यात महाराष्ट्र दिनी गडचिरोली जिल्ह्यातील जांभूळखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात सी-६० पथकाच्या १५ जणांना वीर मरण प्राप्त झाले. शहीद झालेल्या पोलीस जवानांमध्ये नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील चिचघाट येथील पोलीस अमृत प्रभुदास भदाडे यांना वीरमरण प्राप्त झाले.
नक्षलवाद्यांबद्दल सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज, हुतात्मा अमृत भदाडेंच्या आईंना अश्रु अनावर
अमृत यांचा विवाह २ वर्षापूर्वी माधुरीसोबत झाला. त्यांना १ वर्षाची मुलगी आहे. वडील व लहान भाऊ शेतीकाम करतात. अमृत यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांचा आधारस्तंभ हरपला आहे. अमृत यांच्या मृत्यूची वार्ता मिळताच परिसरात शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी शहीद अमृत यांच्या आईंनी सरकारने नक्षलवाद्यांबद्दल ठोस पावले उचलण्याची गरज आहे, अशी भावना व्यक्त केली.
मंगळवारी मध्यरात्री दादा पुरी येथे नक्षलवाद्यांनी तब्बल २७ वाहनांची जाळपोळ केली होती. त्यानंतर नक्षल्यांनी आज पुन्हा कुरखेडा पासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावरील जांभूळखेडा या गावाजवळ भुसुरंग स्फोट घडवून आणला. यात एकूण १५ पोलीस जवान शहीद झाले. नागपूर येथील मौदा नजीकच्या चीचघाट येथील अमृत भदाडे यांना विरमृत्यू प्राप्त झाला.
अमृत यांचा विवाह २ वर्षापूर्वी माधुरीसोबत झाला. त्यांना १ वर्षाची मुलगी आहे. वडील व लहान भाऊ शेतीकाम करतात. अमृत यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांचा आधारस्तंभ हरपला आहे. अमृत यांच्या मृत्यूची वार्ता मिळताच परिसरात शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी शहीद अमृत यांच्या आईंनी सरकारने नक्षलवाद्यांबद्दल ठोस पावले उचलण्याची गरज आहे, अशी भावना व्यक्त केली.
हुतात्मा अमृत भदाडे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर शासकीय इतमामात कन्हान नदीच्या परिसरात मुखाग्नी देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमिवर मौदा शहर दोन दिवस बंद पाळणार आहे.