नागपूर: पहिली घटना पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीतील घोगली गाव ग्रामपंचायत पिपळा येथे घडली आहे. या महिलेचे लग्न २०१९मध्ये आकाश सोबत झाले होते. परंतु त्यांच्यात कौटुंबिक वाद झाल्याने दोघेही वेगवेगळे राहत होते. ही महिला माहेरी आल्यानंतर नातेवाईक आरोपी राजूच्या संपर्कात आली होती. ते दोघेही एकत्र राहू लागले होते. ते एक वर्षापासून आरोपी सोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये होते. राजू रोज दारू पिऊन येत असल्याने भांडणे व्हायचे त्यातचे, काल देखील भांडण झाले असता आरोपी राजूने महिलेची हत्या केली. याप्रकरणी फिर्यादी सिध्दार्थ मिलींद पिल्लेवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे आरोपींविरूध्द विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.
संशयातून केली हत्या: हत्येची दुसरी घटना हिंगणा पोलीस ठाण्यातील हद्दीत घडली आहे. ही महिला हरवल्याची तक्रार वाठोडा पोलीस ठाण्यात दाखल होती. वाठोडा हद्दीत दिघोरी घाट हनुमान मंदिरजवळ किरायाने राहणारी महिला मागील तीन ते चार वर्षांपासून आरोपी दीपक सोबत संबधात होती. ती गेल्या काही दिवसांपासून आरोपी सोबत बोलण्याचे टाळत होती. यादरम्यान आरोपीला संबंधित महिलेचे दुसऱ्या पुरुषासोबत संबंध असल्याचा संशय आला होता. आरोपी दिपकने महिलेला २३ मार्च रोजी भेटण्यासाठी बोलावले असता तो तिला घेऊन पोलीस ठाणे हिंगणाच्या हद्दीत रूई ग्रामपंचायतच्या हद्दीतील झुडपी जंगलात गेला. आरोपींने जंगलात महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केली.