महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोलकात्यातील निवासी डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ नागपुरातील डॉक्टरांचे काम बंद आंदोलन - KOLKATTA

नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालय व महाविद्यालय तसेच इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टर या संपात सहभागी झाले आहेत.

नागपूर

By

Published : Jun 14, 2019, 3:25 PM IST

नागपूर- पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे शासकीय रुग्णालयातील डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नागपुरातील मार्डच्या डॉक्टरांनी एक दिवसाचा संप पुकारला आहे.

कोलकात्यातील निवासी डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ नागपुरातील डॉक्टरांचे काम बंद आंदोलन

नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालय व महाविद्यालय तसेच इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टर या संपात सहभागी झाले आहेत. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत डॉक्टरांचा हा संप सुरू राहणार आहे. यावेळी आपत्कालीन सेवा वगळून इतर सेवा देणारे निवासी डॉक्टर या संपात सहभागी झाले आहेत. काळी फीत बांधून शासकीय मेडिकल रुग्णालयाच्या अधिष्ठाता कार्यालयाबाहेर आंदोलनकारी डॉक्टरांनी प्रदर्शन केले. डॉक्टरांची सुरक्षा अधिक मजबूत करण्याची मागणी यावेळी डॉक्टरांनी केली. हा संप नसून डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याच्या विरोधातील आंदोलन असल्याचे डॉक्टरांनी यावेळी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details