महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मनपाच्या अतिक्रमण कारवाई विरोधात फेरीवाल्यांचा मोर्चा - अतिक्रमणाविरोधात मोर्चा

फेरीवाला दुकानदार संघातर्फे कॉटन मार्केट चौकातून सिव्हिल लाईन परिसरातील महापालिका मुख्यालयावर महापालिकेच्या अतिक्रमण धोरणाविरुद्ध मोर्चा काढण्यात आला होता.

nagpur muncipal corporation
नागपूर महापालिकेच्या अतिक्रमण कारवाई विरोधात फेरीवाल्यांचा मनपावर मोर्चा

By

Published : Feb 11, 2020, 1:36 PM IST

नागपूर - फेरीवाला दुकानदार संघातर्फे आज (११ फेब्रुवारी) महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी महापालिकेच्या अतिक्रमम धोरणाचा निषेध करण्यात आला. महानगरपालिका आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर शहरातील अतिक्रमण विरोधात कारवाया वेगाने होताना दिसत आहेत. रस्त्यावरील अतिक्रमण केलेले दुकाने व अवैध बाजारांवर महापालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा - सहकारी बँकांनी नवीन बदल स्वीकारून स्वतःचे भांडवल उभे करावे - उपमुख्यमंत्री

शहरातील सर्व दहाही झोनमध्ये अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात येत आहे. महापालिकेच्या या कारवाई विरोधात फुटपाथ व फेरीवाला दुकानदार संघातर्फे आज (सोमवारी) मोर्चा काढण्यात आला. कॉटन मार्केट चौकातून सिव्हिल लाईन परिसरातील महापालिकेच्या मुख्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता. कुठलीही पूर्वसूचना न देता अतिक्रमण कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. शहरात 50 हजारांवर फेरीवाले कार्यरत आहेत, असे असताना महापालिकेची कारवाई म्हणजे या फेरीवाल्यांचा रोजगार हिरावण्याचा प्रकार असल्याचाही आरोप केला. त्यामुळे फेरीवाल्यांना महापालिकेने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.

हेही वाचा - शेतातील २५ क्विंटल तुरी जाळल्या; नांदेडच्या हिंगनीमधील घटना

ABOUT THE AUTHOR

...view details