महाराष्ट्र

maharashtra

Marbat Festival 2023 : नागपूरमध्ये ऐतिहासिक मारबत उत्सवाला सुरुवात, सविस्तर जाणून घ्या काळ्या- पिवळ्या मारबतीचं महत्त्व

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 12, 2023, 8:22 PM IST

Marbat Festival 2023 : नागपूरमध्ये ऐतिहासिक मारबत उत्सवाला सुरुवात झालीय. या उत्सवाला 143 वर्षांची परंपरा असल्याचं सांगितलं जातंय. काळी आणि पिवळी मारबत काय आहे, हा उत्सव कसा साजरा केला जातो? याबाबत सविस्तर आपण या विशेष रिपोर्टमधून जाणून घेवू या.

Marbat Festival 2023
मारबत महोत्सव २०२३

नागपूरमध्ये मारबत उत्सवास सुरूवात

नागपूरMarbat Festival 2023 :नागपूरमध्ये 143 वर्ष जुन्या ऐतिहासिक, पौराणिक व तसंच धार्मिक महत्त्व असलेला मारबत उत्सव सुरू झालाय. 143 वर्षांपासून काळी मारबत आणि 139 वर्षांपासून अविरतपणे प्रत्येक नागपूरकरांच्या श्रद्धास्थानी असलेली पिवळी मारबत स्थानापन्न झालीय. पुढील काही हा दिवस मारबत महोत्सव सुरू राहणार आहे. या उत्सवाकडं देशाचं लक्ष लागलेलं असतं, कारण हा उत्सव केवळ उपराजधानी नागपुरामध्येच साजरा केला जातोय.


ऐतिहासिक वारसा :मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला हा ऐतिहासिक वारसा आहे. काळी आणि पिवळी मारबत सध्या विराजमान झालीय. त्यांचं दर्शन घेण्यासाठी नागपूरचं नव्हे तर राज्यातील इतरही भागातून भाविक येऊ लागले आहेत. पोळा सणाच्या चार दिवसांपूर्वी पिवळी आणि काळी मारबतची स्थापना केली जाते. सध्या या दोन्ही मारबत स्थानापन्न झाल्यात. त्यांना पूजण्यासाठी नागरिक आता गर्दी करू लागले आहेत. पिवळी मारबतीला देवीचे रूप म्हणून पुजलं जातं. काळी मारबत ही दुर्जनांचे प्रतीक असल्याची मान्यता (Marbat Festival 2023 in Nagpur) आहे.

ऐतिहासिक परंपरेचे जतन :धावपळीच्या युगात आपल्याला आपल्याच संस्कृतीचा विसर पडतोय, असं असताना राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुराने 143 वर्षे जुन्या ऐतिहासिक परंपरेचे जतन केलंय. समाजातील अनिष्ट प्रथांचं उच्चाटन करण्याच्या हेतूनं बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबतीची मिरवणूक काढली जाते. काळी आणि पिवळी मारबतीसह बडगे तयार केले जातात. मारबत म्हणजे वाईट रुढी- परंपरा,अंधश्रद्धेच दहन करणं. चांगल्या परंपरा, विचारांचे स्वागत करणं हा या मागचा एक उद्देश आहे. कृष्णाच्या वध करण्यासाठी आलेल्या पुतना मावशीचं प्रतीक काळी मारबत आहे, तर लोकांचं रक्षण करणारी पिवळी मारबत आहे. यांच्या दोन विशाल मूर्ती तयार केल्या जातात.


मारबत उत्सव म्हणजे काय :जगभरात प्रसिद्ध झालेला बडग्या-मारबत उत्सव व मिरवणूक हा प्रकार फक्त नागपुरात बघायला मिळतो. मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला ऐतिहासिक वारसा आहे. इंग्रजांची राजवट देशात असताना नागरिकांना एकत्र करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी ज्या पद्धतीनं पुण्यात गणेशोत्सव सुरू केला होता, त्याच पार्श्वभूमीवर नागपुरातदेखील मारबत उत्सव सुरू करण्यात आला (what is marbat festival) होता.

रूढी परंपरा व अंधश्रद्धेचं दहन :गणेशोत्सवापेक्षा ही जुना उत्सव म्हणून मारबत उत्सवाकडे बघितलं जातं. प्राचीन काळात अनेक रूढी परंपरा होत्या. त्या मानव जातीसाठी घातक ठरत असल्यानं त्या रूढी परंपरांचं उच्चाटन व्हावं, म्हणून देखील हा उत्सव साजरा केला जातोय. मारबत उत्सव साजरा करण्यामागं एक उद्धिष्ट आहे. ते म्हणजे, वाईट रूढी परंपरा व अंधश्रद्धेचा दहन करून चांगल्या परंपरा आणि विचारांचा स्वागत करणं. मारबत उत्सवाला महाभारताच्या काळात संदर्भदेखील दिला जातो.



पिवळी मारबतीची परंपरा :नागपूरच्या जगनाथ बुधवारी भागात राहणाऱ्या तेली समाज बांधवांनी पिवळी मारबत उत्सव 1885 साली साजरा करण्यास सुरुवात केली. यावर्षी पिवळ्या मारबतीला 139 वर्ष पूर्ण झाले आहेत. लोकांच्या रक्षणासाठी पिवळी मारबतीची मिरवणूक काढली जाते. पिवळ्या मारबतीची मिरवणूक काढल्यानंतर तिचं दहन केलं जातं. विशेष म्हणजे लहान मुलांना घेऊन महिला दर्शनासाठी (how celebrates marbat festival) येतात.

  • काळी मारबतीची परंपरा :त्याकाळी भोसले राजघराण्यातील बाकाबाई यांनी इंग्रजांसोबत हात मिळवणी केली होती. त्याविरोधात काळी मारबत काढली जाते, त्याच ृबरोबर काळी मारबतीला महाभारताचा संदर्भ देखील दिला जातो. आज काळी मारबत या परंपरेला 143 वर्ष पूर्ण झाले आहेत.

हेही वाचा :

  1. Marbat Festival 2022 नागपुरात ऐतिहासिक बडग्या मारबत उत्सवाची अभूतपूर्व रंगत, काळी पिवळी मारबतची गळा भेट बघण्यास लाखो नागरीकांची गर्दी
  2. Marbat Festival 2022 ईडा पिडा घेऊन जागे मारबतच्या घोषानांनी दुमदुमला परिसर, उत्सवाला सुरुवात
  3. Marbat Festival 2022 ईडा पिडा घेऊन जागे मारबत, काय आहे मारबतीचा इतिहास आणि परंपरा...

ABOUT THE AUTHOR

...view details