महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ravindra Shobhane Introduction: अ. भा. मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे; जाणून घ्या परिचय - रवींद्र शोभणे परिचय

ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढील वर्षी २, ३, ४ फेब्रुवारी अमळनेर येथे होणार आहे. डॉ. रवींद्र शोभणे यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील खरसोली या गावी झाला. नागपूर विद्यापीठ येथून त्यांनी ‘कादंबरीकार श्री. ना. पेंडसे’ या विषयावर प्रबंध सादर करून १९८९ साली पीएच.डी. ची पदवी प्राप्त केली आहे.

Ravindra Shobhane Introduction
डॉ. रवींद्र शोभणे

By

Published : Jun 25, 2023, 10:24 PM IST

नागपूर:कथा, कादंबरी, नाट्य, कविता, समीक्षा, ललित, अशा विविध साहित्यप्रकारात लेखन करणार्‍या डॉ. रवींद्र शोभणे यांची वयाच्या ३४ व्या वर्षी ‘प्रवाह’ ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली. कथालेखक म्हणूनही डॉ. रवींद्र शोभणे परिचित आहेत.


परिचय:
पूर्ण नाव: डॉ. रवींद्र केशवराव शोभणे
जन्म: १५ मे १९५९ ( खरसोली, जि. नागपूर)
शिक्षण: एम.ए. (मराठी), बी.एड्. पीएच.डी.
1) बी.ए.ला मराठी वाड्‌मय या विषयात प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल नागपूर विद्यापीठाचे जयंतीबाई कोलते रौप्यपदक.
2) एम. ए.ला विद्यापीठातून गुणानुक्रमे द्वितीय मेरिट
3) निवृत प्राध्यापक (धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूर)


प्रकाशित पुस्तके कादंबऱ्या:
१) प्रवाह (म.रा.सा.सं.मंडळाच्या अनुदानातून (प्रकाशित ) १९८३
२) रक्तध्रुव (दु.आ./ विजय प्रकाशन, नागपूर ) १९८९
३) कोंडी (दु.आ./ देशमुख आणि कं., पुणे) १९९९
४) चिरेबंद (देशमुख आणि कं., पुणे) १९९५
५) सव्वीस दिवस (दु.आ./ विजय प्रकाशन, नागपूर) १९९६
६) उत्तरायण (दु.आ./मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई) २००१
७) पडघम (मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई) २००७
८) पांढर (मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई) २००९.
९) अश्वमेध (मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई ) २०१४
१०) पांढरे हत्ती (विजय प्रकाशन, नागपूर) २०१६
११) होळी (मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई) २०२१


कथासंग्रह:
1) वर्तमान (मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई) १९९१
२) दाही दिशा (दु.आ./ विजय प्रकाशन, नागपूर ) १९९४
३) शहामृग (मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई) १९९८
४) तद्‌भव (दु.आ./ साकेत प्रकाशन, औरंगाबाद) २००४
५) अदृष्टाच्या वाटा (निवडक कथा, विजय प्रकाशन, नागपूर) २००८
६) चंद्रोत्सव (विजय प्रकाशन, नागपूर) २०११
७) ओल्या पापाचे फूत्कार (विजय प्रकाशन, नागपूर) २०१४-
८) महत्तम साधारण विभाजक (निवडक कथांचे संपादन / विजय प्रकाशन) संपा. डॉ. अनिल बोपचे
९) भवताल ( विजय प्रकाशन नागपूर) २०२० ललित लेखसंग्रह
10) ऐशा चौफेर टापूत (ऋच्चा प्रकाशन, नागपूर )२००७


व्यक्तिचित्रसंग्रह:
गोत्र (राजहंस प्रकाशन, पुणे ) २०१९


वैचारिक:
महाभारताचा मूल्यवेध (दु.आ./ विजय प्रकाशन, नागपूर) २०१० समीक्षा
१) कादंबरीकार श्री. ना. पेंडसे (त्राचा प्रकाशन, नागपूर) १९९५

२. सत्त्वशोधाच्या दिशा (मंगेश प्रकाशन, नागपूर) २००५

३) संदर्भासह (विजय प्रकाशन, नागपूर) २००७

४) महाभारत आणि मराठी कादंबरी (विजय प्रकाशन, नागपूर) २०१२

५) त्रिमिती (विजय प्रकाशन, नागपूर) २०१३

६) साक्षेप (दिलीपराज प्रकाशन, पुणे) आगामी २०२३


संपादने:

१) कथांजली (ऋचा प्रकाशन, नागपूर) १९९१
२) मराठी कविता: परंपरा आणि दर्शन (विजय प्रकाशन, नागपूर) २००६
३) जागतिकीकरण, समाज आणि मराठी साहित्य ( विजय प्रकाशन, नागपूर) २०११


अनुवाद:

१) सव्वीस दिवस (हिंदी) छब्बीस दिन: अनुवादक: डॉ. उषा भुसारी
२) महाभारताचा मूल्यवेध (गुजराती) महाभारतना मूल्योनी वेधः
३) कोंडी (हिंदी) घिर गया है समय का रथ, अनुवादक: डॉ. सरजुप्रसाद मिश्र
४) पांढर (हिंदी): अनुवादक: संध्या पेडणेकर
५. उत्तरायण (इंग्रजी): अनुवादकः शुभा पांडे (West Land Publication)


रवींद्र शोभणे यांनी केलेले मराठी अनुवाद:

१. अनंत जन्मांची गोष्ट विश्वनाथप्रसाद तिवारी यांच्या हिंदी कवितांचा अनुबाद (मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई)

सॉक्रेटिस कधी मरत नसतो: माधव कौशिक यांच्या हिंदी कथांचा अनुवाद (आगामी) (रोहन प्रकाशन)


साहित्याविषयी:

१. सत्यापासून साहित्यापर्यंत (रवींद्र शोभणे यांच्या साहित्यावरील निवडक समीक्षा) विजय प्रकाशन, नागपूर- २०१५ संपा. डॉ. वंदना महाजन

२. मराठी कादंबरी: परंपरा आणि चिकित्सा (गौरवग्रंथ) विजय प्रकाशन २०१९ संपा. डॉ. राजेंद्र सलालकर, डॉ. अनिल बोपचे


पुरस्कार:

१. लोकमत पुरस्कार (ललितलेखन)

२. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ग.ल. ठोकळ पुरस्कार (कोडी)

३. नाथमाधव साहित्य पुरस्कार (कोंडी) ४. भि. ग. रोहमारे पुरस्कार (कोंडी)

५. महाराष्ट्र शासनाचा वाङ्मय पुरस्कार (कोंडी)

६. कामगार कल्याण केंद्राचा उत्कृष्ट नाट्यलेखन पुरस्कार:

(एक दीर्घ सावली) ७. ग्रंथोत्तेजक पुरस्कार (चिरेबंद)

८. रणजित देसाई पुरस्कार (चिरेबंद ) ९. विदर्भ साहित्य संघाचा वा. कृ. चोरघडे पुरस्कार ( शहामृग )

१०. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शंकर पाटील कथा पुरस्कार ( शहामृग ) ११. डॉ. अ. वा. वर्टी कथा पुरस्कार (कथालेखनातील योगदानासाठी )

१२. विदर्भ साहित्य संघाचा पु. य. देशपांडे पुरस्कार (उत्तरायण)

१३. घनश्यामदास सराफ साहित्य पुरस्कार (उत्तरायण)

१४. महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार (अमेरिका) (उत्तरायण) १५. समाजप्रबोधन प्रतिष्ठानचा पुरस्कार (सत्त्वशोधाच्या दिशा )

१६. सहकार महर्षी बापूसाहेब देशमुख कथा पुरस्कार (तद्भव)

१७. औरंगाबाद महानगरपालिकेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ पुरस्कार (तद्भव)

१८. आपटे वाचन मंदिरचा (इचलकरंजी) कादबरी पुरस्कार (पडघम) १९. डॉ. अनंत व लता लाभशेटवार प्रतिष्ठानचा एक लक्ष रुपयांचा साहित्य

सन्मान पुरस्कार (अमेरिका) (साहित्यनिर्मितीच्या विशेष योगदानासाठी ) २०. महाराष्ट्र शासनाचा ह. ना. आपटे कादंबरी पुरस्कार ( पडघम )

२१. शांताराम कथा पुरस्कार (भळभळून वाहणारी गोष्ट)

२२. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहित्य पुरस्कार (पांढर) २३. कादंबरीकार वि.स.खांडेकर पुरस्कार (कादंबरीलेखनातील योगदानासाठी) २४. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा मृत्युंजय पुरस्कार (महाभारताचा मूल्यवेध)

२५. मराठवाडा साहित्य परिषदेचा नरेंद्र मोहरीर पुरस्कार (महाभारताचा मूल्यवेध)

२६. पुणे मराठी ग्रंथालयाचा राजेंद्र बनहट्टी कथा पुरस्कार (चंद्रोत्सव)

२७. प्राब्दवेल प्रतिष्ठानचा (लातूर) कथा पुरस्कार (चंद्रोत्सव) २८. महाराष्ट्र शासनाचा दिवाकर कृष्ण कथा पुरस्कार (चंद्रोत्सव)

२९. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार (अश्वमेध) ३०. ना. सी. फडके पुरस्कार ( अश्वमेघ )

३१. 'मृत्युंजय' कार शिवाजी सावंत स्मृती साहित्य पुरस्कार (साहित्यविषयक योगदानासाठी)

३२. मनोरमा साहित्य पुरस्कार (उत्तरायण)

३३. डॉ. गिरीश गांधी प्रतिष्ठानचा मीरादेवी पिंचा कादंबरी पुरस्कार ३४. यशवंतराव चव्हाण साहित्यिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचा पुरस्कार, जालना (होळी)


मानसन्मान:
१. साहित्य अकादमीची प्रवासवृत्ती १९९४
२. नरखेडभूषण पुरस्कार २००५ ३. सल्लागार, सदस्य- साहित्य अकादमी दिल्ली (मराठी भाषा) २००८ ते २०१२
४. सदस्य अ. भा. मराठी साहित्य महामंडळ २०११-२०१२ ५. सदस्य, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
६. आमंत्रक साहित्य संमेलन समिती विदर्भ साहित्य संघ २००७ ते २०२६ (विदर्भ पातळीवर एकूण चौदा साहित्य संमेलनांचे आयोजन


भूषविलेली संमेलनाध्यक्षपदे:
१. विदर्भ साहित्य संघाच्या पहिल्या युवा साहित्य समेलनाचे अध्यक्षपद (पुसद) २००३
२. पाचव्या सूर्योदय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (जळगाव) २००९
३. बाराव्या समरसता साहित्य समेलनाचे अध्यक्षपद (अंबाजोगाई) २०१०
४. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बाविसाव्या मराठी

ABOUT THE AUTHOR

...view details