महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिव्यांग मनोज ठक्कर मृत्यू प्रकरण; पोलीस उपनिरीक्षकासह तिघे निलंबित - NAGPUR CRIME DEATH

दिव्यांग मनोज ठक्कर यांच्या मृत्यूमुळे तब्बल दोन दिवस पारडी परिसरात तणाव होता. नागपुरातील स्थानिक आमदारांनी या घटनेची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती. या घटनेत पोलीस उपनिरीक्षकासह तिघांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहे.

दिव्यांग मनोज ठक्कर मृत्यू प्रकरण
दिव्यांग मनोज ठक्कर मृत्यू प्रकरण

By

Published : Jul 21, 2021, 11:53 AM IST

नागपूर -पोलिसांच्या मारहाणीत मनोज ठक्कर नामक दिव्यांग तरुणाचा मृत्यू झाला होता, या प्रकरणातील तीन कर्मचाऱ्यांना नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी निलंबित केले आहे. यात उपनिरीक्षक मुकेश ढोबळे, पोलीस शिपाई नामदेव चरडे आणि आकाश शहाने यांचा समावेश आहे. दिव्यांग मनोज ठवकर मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी सुरू असून सर्व निलंबित कर्मचाऱ्यांची बदली पोलीस मुख्यालय करण्यात आली होती.

मनोज ठक्कर

ही घटना नागपूर शहरातील पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घडली. नाकेबंदी दरम्यान मनोजची दुचाकी पोलिसांच्या वाहनावर धडकली होती. ज्यामुळे संतप्त झालेल्या पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली. ज्यामुळे दिव्यांग मनोजचा मृत्यू झाला होता. मनोज काही कामानिमित्ताने बाजाराला गेले होते. तिथून ते परत घरी येत असताना पारडी परिसरात पोलिसांची नाकाबंदी कारवाई सुरू होती. ज्यामध्ये ड्रिंक आणि ड्राइव्ह सह मास्क संदर्भातील कारवाई केली जात होती. पोलिसांनी मनोज यांना थांबण्याचा इशारा केला. मात्र, मनोज आपली दुचाकी घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यामुळे त्यांच्या दुचाकीची धडक पोलीसांच्या गाडीला लागली. या घटनेमुळे संतापलेल्या पोलिसांनी मनोज ठक्कर यांना नाकेबंदीच्या ठिकाणीच मारहाण केली. यात मनोजचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर पारडी परिसरातील नागरिक प्रचंड संतप्त झाले होते.

पोलीस उपनिरीक्षकासह तिघे निलंबित
घटनेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रारदिव्यांग मनोज ठवकर यांच्या मृत्यू मुळे तब्बल दोन दिवस पारडी परिसरात तणाव होता. नागपुरातील स्थानिक आमदारांनी या घटनेची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती. या घटनेत पोलीस उपनिरीक्षकासह तिघांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहे.
फडणवीसांची घेतली भेट
नेत्यांच्या भेटीगाठी सुरूमनोज ठक्कर यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मनोज ठवकर यांच्या घरी भेट दिली आहे,यावेळी सर्वांनी कडक कारवाईची मागणी केली होती.
फञणवीसांकडे केला पाठपुरावा

हेही वाचा -सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई मॉडेल स्वीकारणार का?'

ABOUT THE AUTHOR

...view details