महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तलवार घेऊन वस्तीत दहशत निर्माण करण्याचा गुंडाचा प्रयत्न; पोलिसांनी केली अटक - तलवारीची दहशत

धुलीवंदन साजरी करताना उद्भवलेल्या वादातून एक तरुण तलवार घेऊन वस्तीत गोंधळ घालत असल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे. ही घटना नागपूरच्या वाडी परिसरात वैष्णव माता नगरमध्ये घडली. गुन्हेगारी वृत्तीच्या गोपाळचा एका महिलेसोबत जागेचा वाद सुरू आहे.

Gopal Pedraj
गोपाळ पेदराज

By

Published : Mar 13, 2020, 11:37 AM IST

Updated : Mar 13, 2020, 11:46 AM IST

नागपूर - धुलीवंदन साजरी करताना उद्भवलेल्या वादातून एक तरुण तलवार घेऊन वस्तीत गोंधळ घालत असल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे. ही घटना नागपूरच्या वाडी परिसरात वैष्णव माता नगरमध्ये घडली. गोपाळ पेदराज असे या तरुणाचे नाव आहे.

तलवार घेऊन वस्तीत दहशत निर्माण करण्याचा गुंडाचा प्रयत्न

गोपाळने एका महिलेला धमकावत तिच्या घरी तलवार घेऊन गेला. धुलीवंदननंतर मद्यपान करून या गुंडाने हातात तलवार घेऊन वस्तीत गोंधळ घातला. गुन्हेगारी वृत्तीच्या गोपाळचा एका महिलेसोबत जागेचा वाद सुरू आहे. होळीच्या दिवशीही पेदराजने आपल्या सहकाऱ्यांसह त्या महिलेला धमकावले होते. काल पुन्हा हातात तलवार घेऊन वस्तीत दहशत पसरवत त्या महिलेच्या घरी जाऊन धमकावल्याचे समोर आले आहे. लोकांनी या गुंडगिरीचा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत गोपाळ पेदराजला अटक केली.

Last Updated : Mar 13, 2020, 11:46 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details