नागपूर - उपराजधानी नागपुरात अल्पवयीन दिव्यांगं मुलीवर आत्याचार करणाऱ्या आरोपीला 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश केजी राठी यांनी ही शिक्षा सुनावली आहे. महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात आली. यानंतर राज्यातीलच नव्हे, तर देशातील पहिली कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. आकाश बंटक येदानी, असे आरोपीचे नाव आहे.
काय आहे प्रकरण -
नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 4 नोव्हेंबर 2018मध्ये हे प्रकरण सामोरे आले. यात एकाच गावात राहणाऱ्या आरोपीने अल्पवयीन दिव्यांगं मुलीवर तिच्या अज्ञानातेचा गैरफायदा घेतला. यात आकाश येदानी हा विवाहित असून त्याला दोन अपत्य होते. त्याने पीडित दिव्यांगं मुलीवर अत्याचार केला. यात त्यामुळे तिला गर्भधारणा झाली. ही बाब जेव्हा आईच्या लक्षात आली, तेव्हा काटोल पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये नवीन कलमाच्या सुधारणे नुसार 376 (2) एनएल 376(3) तसेच बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याच्या कलम 5(3) आणि कलम 10 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करत सक्षपुरावे गोळा करून दोषारोप पत्र न्यायालयात सादर करण्यात आले. यामध्ये पोस्को कायद्या अंतरंग सरकारी वकील म्हंणून रश्मी खापर्डे यांनी पीडितेची बाजू मांडली. यामध्ये पीडित मुलगी ही 16 वर्षाची असून तिचे बौद्धिक वय हे 8 वर्ष आहे. तसेच या पीडित मुलीची गर्भाची डीएनएन चाचणी करण्यात आली. यामध्ये या अहवालात तो आरोपीचा असल्याचा अहवाल आला. यामध्ये दोन्ही बाजू एकूण घेत सुधारित कायद्यानुसार मुलीचे वय 16 वर्षापेक्षा कमी असल्याने आरोपीला 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आली.