नागपूर - शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वेरुळावर दोन दिवसांपूर्वी एका मृतदेह आढळला होता. प्रथमदर्शनी ही आत्महत्या वाटत असली तरी, पोलीस तपासात ही हत्याच असल्याचे उघड झाले आहे. प्रमोद उदापुरे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सतीश ऊर्फ दादू वाघमारे आणि साहिल अशी आरोपींची नावे आहेत.
पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयातून मित्राची हत्या.. - मित्राची हत्या नागपूर
प्रमोद आणि दादू हे दोघेही कळमना बाजारात मोलमजुरी करायचे. प्रमोदचे आपल्या बायकोसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय दादूला होता. त्यावरून दोघांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वादावादी सुरू होती. दोघांनाही दारूचे व्यसन होते.
प्रमोद आणि दादू हे दोघेही कळमना बाजारात मोलमजुरी करायचे. प्रमोदचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय दादूला होता. त्यावरून दोघांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वादावादी सुरू होता. दोघांनाही दारूचे व्यसन होते. रविवारी घटनेच्या दिवशी दोघांनी त्यांच्या मित्रांसोबत दारू प्यायली. त्यावेळी वादावादी होऊन दादू आणि त्याच्या मित्राने प्रमोदला मारहाण केली. त्यानंतर प्रमोदला दुचाकीवर बसवले आणि त्याला कळमना हद्दीतील रेल्वे रुळावर फेकून दिले. यात त्याचा मृत्यू झाला.
प्रथमदर्शनी हा अपघात वाटावा, असा प्रयत्न आरोपींनी केला. मात्र ज्यावेळी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली तेव्हा हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी प्रमोद खून प्रकरणात मुख्य आरोप दादू आणि अन्य एक आरोपी साहिलला अटक केली आहे.