महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nagpur Crime : धक्कादायक! नागपुरात नववर्षाच्या पूर्वसंध्येला बिअर बारमध्ये झालेल्या भांडणात एकाचा मृत्यू - राजेश मेश्राम खून प्रकरण

नागपूर शहरात रविवारी भरदिवसा एका दुकानासमोर एका व्यक्तीशी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला (New Year Evening in Nagpur) वाद घातला. दरम्यान पाच जणांनी या व्यक्तीचा खून (Man killed) केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. राजेश मेश्राम असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. बिअर बारमध्ये झालेल्या वादाच्या (fight in beer bar) रागातून आरोपींनी खून (Man killed after fight in beer bar ) केल्याची माहिती समोर आली आहे.

Nagpur Crime
नागपूरात खून

By

Published : Jan 1, 2023, 9:35 PM IST

नागपूर : शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. शहरात नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला (New Year Evening in Nagpur) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंतर्गत वादातून पाच व्यक्तींनी दिवसा ढवळ्या राजेश मेश्राम या व्यक्तीची निघृणपणे खून (Man killed after fight in beer bar) केला आहे. दरम्यान चार आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे.

काय आहे प्रकरण : मृत राजेश मेश्राम (23) आणि पाच आरोपींमध्ये शनिवारी संध्याकाळी नागपूरातील समता नगर भागातील एका बिअर बारमध्ये काही कारणावरून भांडण झाले होते. यावरून पाच जणांनी बदला घेण्याचा कट रचला. दरम्यान, रविवारी सकाळी 10 वाजता कमल स्क्वेअर येथील एका पान दुकानासमोर मेश्रामला या पाच जणांनी अडवले. भरदिवसा नागरिकांसमोर त्या व्यक्तीची भोसकून हत्या करण्यात आली.

चार अटकेत, एक फरार : घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, "आम्ही हत्येप्रकरणी चार जणांना अटक केली आहे, तर एक आरोपी फरार आहे. त्यांनी वापरलेली कार परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसली आहे. आरोपी हे हिस्ट्रीशीटर आहेत, तर मृत व्यक्तीवर त्याच्या नावावर शस्त्रास्त्र कायद्याचा गुन्हा दाखल आहे."

ABOUT THE AUTHOR

...view details