महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nagpur Double Murder Case : पत्नी आणि मुलीची हत्या केल्यानंतर 'त्याने' केली आत्महत्या, हिंगणा एमआयडीसीतील घटना - पत्नी मुलीची हत्या करून आत्महत्या

हिंगणा एमआयडीसीतील राजीव नगर येथे एका व्यक्तीने पत्नी आणि मुलीची निर्घृण ( Person Suicide After Murder Of Wife And Daughter ) हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

Man Commit Suicide After murder In Nagpur
Man Commit Suicide After murder In Nagpur

By

Published : Mar 12, 2022, 8:25 AM IST

Updated : Mar 12, 2022, 12:20 PM IST

नागपूर -नागपूरच्या हिंगणा एमआयडीसी परिसरातील राजीव नगर येथील सरोदे मोहल्ल्यात एका व्यक्तीने ४० वर्षीय पत्नी आणि १२ वार्षीय मुलीची अतिशय निर्दयपणे हत्या ( Person Suicide After Murder Of Wife And Daughter ) केल्यानंतर स्वतः देखील घराच्या आवारात असलेल्या झाडाला दोर बांधून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रंजना विलास गवते आणि अमृता विलास गवते, अशी हत्या झालेल्या दोघींची नावं आहेत, तर विलास चंपत गवते, असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. महत्त्वाचे म्हणजे विलास यांनी घरातच झोपलेल्या १० वर्षीय मुलाला कोणत्याही प्रकारची ईजा केली नाही. रात्री दोन ते तीन वाजल्याच्या सुमारास ही रक्तरंजीत घटना घडली आहे. या संपूर्ण घटनेत बचावलेल्या मुलाने शेजारच्यांना माहिती दिल्यानंतर ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती समजताच एमआयडीसी, हिंगणा पोलिसांनी घटनास्थळ गाठून तीनही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकलमध्ये रवाना केल्यानंतर तपास सुरू केला आहे.

प्रतिक्रिया

विलास गवते यांची आर्थिक परिस्थिती चागली होती. त्यांचा दुधाचा व्यवसाय होता. विलास यांच्याकडे 12 म्हशी आणि काही गायी होत्या. त्यामुळे त्याना पैश्याची अडचण नव्हती. गेल्याचं महिन्यात त्यांनी मोठ्या मुलीचे लग्न केले होते. त्यानंतर त्यांच्या तब्येतमध्ये चांगली सुधारणा दिसत होती. मात्र, कुणीही विचार करू शकणार नाही, अशी घटना घडल्याने गवते कुटुंबियांसह संपूर्ण सरोदे मोहल्ला स्तब्ध झाला आहे.

मुलाने दिली माहिती -

विलास गवते यांनी पत्नीची गळा चिरून हत्या केल्यानंतर जागी झालेल्या मुलीची हत्या केली. मात्र, त्याच ठिकाणी झोपलेल्या मुलाला मात्र त्यांनी कोणतीही इजा केली नाही. रात्री दोनच्या सुमारास मुलगा जागा झाला तेव्हा त्याच्या शेजारी झोपलेली आई आणि बहीण रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असल्याचं दृश्य त्याच्या नजरेस पडते, त्याने वडिलांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते कुठेही दिसत नसल्याने त्याने शेजारी राहत असलेल्या काकांना आवाज देऊन संपूर्ण घटनेची माहिती दिली.

विलास हे मानसिक तणावात होते -

विलास गवते हे गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावात होते. त्यामुळे त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. तणावात असल्यामुळेचं त्यांनी पत्नीला घराबाहेर जाण्यास मज्जाव केला होता. त्यामुळे त्यांच्यात नेहमी खटके उडायचे. विलासदेखील घराबाहेर फारच कमी पडायचे. केवळ दूध देण्यासाठी ग्राहकांच्या घरी जात असल्याची माहिती पुढे आली आहे.

हेही वाचा-Missiles Landed In Pakistan: पाकिस्तानात क्षेपणास्त्र पडल्यानंतर भारताने दिले चौकशीचे आदेश

Last Updated : Mar 12, 2022, 12:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details