नागपूर- घराबाहेर पडताना मास्क का घातला नाही. तसेच वाहन रस्त्यावर अवैधरित्या का लावले, अशी विचारणा केल्याने एका चारचाकी चालकाने पोलिसाच्या वाहनाची काच फोडत पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. ही घटना कोतवाली पोलीस ठाण्यात हद्दीत घडली आहे.
नागपुरात पोलीस वाहनावर दगडफेक करत कर्मचाऱ्याला मारहाण, एक अटकेत
अवैधरित्या वाहन रस्त्यावर का लावले तसेच तोंडाला मास्क का लावले नाही याची विचारणा करत असताने एका व्यक्तीने पोलिसाला मारहाण केली. तसेच पोलीस वाहनावर दगडफेक करत काच फोडली. याप्रकणी आरोपीस अटक करण्यात आली आहे.
कार्तिक साहू, असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने कोतवाली पोलीस निरीक्षकाच्या गाडीच्या काचा फोडल्या. तसेच एका कर्मचाऱ्याला धकाबुक्की करत पोलिसांवर दगफेकही केली आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत भोला गणेश चौकाजवळ एक चारचाकी रस्त्यावर अवैधपणे पार्क केल्याची तक्रार आली होती. याबाबत चौकशी करण्यासाठी पोलीस निरीक्षक भोसले आणि कर्मचारी तिथे पोहचले. त्यांनी गाडीच्या मालकाला बोलवले असता तो मास्क न घालता बाहेर आला. त्याबाबत पोलिसांनी विचारणा केली असता आरोपी कार्तिक साहूने पोलिसांशी हुज्जत घालत पोलिसांवरच धावून आला. त्याने पोलीस निरीक्षकांच्या गाडीच्या काच फोडली तसचे एका कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत दगडफेकही केली. कोतवाली पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा -नागरिकांनो घरातच बसा! नागपुरातील 'कोरोना हॉटस्पॉट' भागात एसआरपीएफ तैनात