महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बेड आणि रेमडेसिवीर इंजेक्शनच्या व्यवस्थापनात समन्वय ठेवा - पालकमंत्री डॉ. नितीन राऊत - रेमडेसिवीर इंजेक्शनात समन्वय ठेवा

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. या इंजेक्शनसह रुग्णालयातील बेड आणि लसीच्या उपलब्धतेसंदर्भात सर्व शासकीय -अशासकीय यंत्रणांनी आपसात अधिक समन्वय करुन प्रभावी व्यवस्थापन करावे असे आदेश पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले.

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

By

Published : Apr 11, 2021, 10:53 AM IST

नागपूर - कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याचे दिसत आहे. या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. या इंजेक्शनसह रुग्णालयातील बेड आणि लसीच्या उपलब्धतेसंदर्भात सर्व शासकीय -अशासकीय यंत्रणांनी आपसात अधिक समन्वय करुन प्रभावी व्यवस्थापन करावे असे आदेश पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले.

बेड आणि रेमडेसिवीर इंजेक्शनच्या व्यवस्थापनात समन्वय ठेवा

ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी तर शहरासाठी महानगरपालिका आयुक्त यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मागणी व पुरवठ्यावर नियंत्रण ठेवून गरजूंना ते उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.पालकमंत्री म्हणाले की, महामारीचे संकट असताना रेमडेसिवीर हाच एकमेव रामबाण उपाय समजून खासगी डॉक्टर त्याचा अवाजवी वापर करत आहेत. मात्र, रुग्णांना केवळ गंभीर स्थितीतच रेमडेसिवीरचा वापर केला पाहीजे. रेमडेसिवीर खरेदी करण्यासाठी रूग्णांच्या नातेवाईकांच्या रांगा दिसून येतात. रुग्णांच्या नातेवाईकांकडून वाढीव पैसे उकळण्यात आल्याचे काही ठिकाणी निदर्शनास आले आहे. जिल्ह्यात गरजू रुग्णांना रेमडेसिवीर उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांनी समन्वय ठेवावा. अन्न व औषध प्रशासन विभागानेही दक्ष राहून याबाबत आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेण्याचे निर्देश डॉ.नितीन राऊत यांनी विभागीय आयुक्तांना बैठकीत दिले. या बैठकीला आमदार विकास ठाकरे, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपस्थित होते.

लोकांचा बेजबाबदारपणा येतोय अंगलट...

जिल्हयातील ग्रामीण भागात ताप ,सर्दी अशी लक्षणे दिसताच लोकांचे दुर्लक्ष करण्याच्या सवयीमुळे रूग्ण गंभीर अवस्थेत शहरात धाव घेत आहेत. काल काही गंभीर रूग्णांना अमरावती येथील सुपर स्पेशलिटी हॉस्पीटलला पाठवावे लागले. रूग्णांची वाढती संख्या ही आरोग्य यंत्रणेवर ताण वाढवत आहे. म्हणूनच संसर्ग होताच गाव परिसरातील डॉक्टरांमार्फत तालुकास्तरावरील नियंत्रण कक्षाकडे माहिती जाणे गरजेचे आहे. रूग्णांच्या संख्येच्या तुलनेत प्रभावी बेड व्यवस्थापन करण्यात यावे, असेही निर्देश त्यांनी विभागीय आयुक्तांना दिले. ग्रामीण भागात शांतता समितीच्या धर्तीवर तहसीलदार,पोलीस निरीक्षक यांनी तालुकास्तरावर कार्यरत डॉक्टरांची बैठक घेवून त्यांच्याकडून संशयित रूग्णांची माहिती घ्यावी. शहरातही झोननिहाय अशाच पध्दतीची समन्वय यंत्रणा करावी असे त्यांनी यावेळी सूचित केले.

पालकमंत्र्यांची बैठक
लसीकरण वाढविणे हाच कोरोना प्रतिबंधाचा मार्ग....

कोरोना निर्बधांच्या काळात लसीकरणाला जाण्यासाठी बस उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी महानगरपालिका आयुक्तांना केले. महामारीच्या या कठीण प्रसंगी शासकीय वैदयकीय महाविदयालयात नव्याने रूजू झालेल्या मात्र कर्तव्यपालनात कसूर करणाऱ्या डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्याचे त्यांनी बजावले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय आणि अनुसंधान केंद्र येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या प्रक्रियेची माहिती त्यांनी घेतली. ही तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सोबतच बाजूच्या परिसरात लसीकरण केंद्र सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details