नागपूर -महाराष्ट्र विधानसभेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित येऊन महाविकासआघाडी स्थापन केली. यानंतर राज्याला नवीन सरकार मिळाले. हीच आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्रितपणे लढणार की स्वतंत्रपणे यावर बऱ्याच प्रमाणात चर्चा झडताना दिसून येत आहेत. नागपूर जिल्हापरिषद निवडणुकीत महाविकासआघाडी एकत्रित निवडणूक लढवू शकतील, अशी माहिती समोर आली आहे.
जिल्हा परिषदेसाठी महाविकास आघाडी एकत्र? २५० जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती - Alliance
राज्यपातळीवर ३ प्रमुख पक्षांनी एकत्र येऊन महाविकासआघाडीचा प्रयोग यशस्वी केला. हाच प्रयोग राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत यशस्वी होईल का किंवा यामध्ये काय अडचणी येऊ शकतात, हे आगामी काळात स्पष्ट होईल.
![जिल्हा परिषदेसाठी महाविकास आघाडी एकत्र? २५० जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती Nagpur Congress](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5345902-thumbnail-3x2-nag.jpg)
विधानसभा निवडणुकीत जनतेनी भाजपला कौल दिला होता. मात्र, बहुमत नसल्याने भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही आणि शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली. महाविकास आघाडीची सत्ता असल्याने येत्या जिल्हापरिषद निवणुकीसाठी महाविकास आघाडीची उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची गर्दी बघायला मिळत आहे.
राज्यात सत्ता स्थापन करून पाहिला प्रयोग केल्यानंतर आता स्थनिक संस्थांमध्येदेखील महाविकास आघाडी प्रयोग करणार आहे. येत्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडी तयारीला लागली आहे. २५० जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर महाविकास आघाडीचा प्रयोग जिल्हा परिषदेत कितपत यशस्वी ठरेल हे बघणं महत्वाचे आहे.