नागपूर - हिवाळी अधिवेशनाला आज (सुरूवात) झाली. यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल केलेले वादग्रस्त वक्तव्य संदर्भातील विषय मांडण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उठले. मात्र, विधानपरिषदेच्या पटलावर त्यांचा विषय घेण्यास नकार दिल्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी गोंधळ घालत सभागृहाचा त्याग केला.
विधान परिषदेचे हिवाळी अधिवेशानाला आज (सुरूवात) झाली आहे. पहिल्या दिवशीच्या कामकाजाची सुरुवात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अभिनंदन प्रस्तावाने झाली. यानंतर विरोधी पक्षनेते पदाची निवड करण्यात आली. विधानसभेचे काम काज बंद पडल्यानंतर राहुल गांधी यांनी सावरकर संदर्भात केलेल्या वक्तव्याचे पडसाद विधान परिषदमध्ये सुद्धा उमटल्याचे बघायला मिळाले.