नागपूर - हिवाळी अधिवेशनाला आज (सोमवारी) सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडी सरकारने पुरवणी मागण्यांमध्ये अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी 750 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर राज्य विधिमंडळात 16 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या आहेत.
हिवाळी अधिवेशन : राज्य विधिमंडळात 16 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर - State Legislature demands Nagpur session
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडी सरकारने पुरवणी मागण्यांमध्ये अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी 750 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
नागपूर
तर दुसरीकडे सावरकरांच्या टीकेवरील मुद्द्यावरुन पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झालेले होते.
सरकारने केलेल्या पुरवणी मागण्यात या बाबींचा समावेश -
- पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नकसान भरपाईसाठी पुरवणी मागण्यात 4500 कोटींची तरतूद
- ऑक्टोबर 2019 मध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्याच्या भरपाईसाठी 750 कोटींची मदत
- पंतप्रधान पीक विमा योजनेच्या हफ्त्यांसाठी शेतकऱ्यांना 500 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य
- नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी 525 कोटी निधीची तरतूद