महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bacchu Kadu On Ambadas Danve: '...तेव्हा अंबादास दानवेंचा जन्मही झाला नसेल'

शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागेल, असे मत आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केलं होतं. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्षेप नोंदवला होता. या घडामोडी घडत होत्या त्यावेळी अंबादास दानवे यांचा जन्मदेखील झाला नव्हता, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला.

Bacchu Kadu On Ambadas Danve
बच्चू कडू

By

Published : Aug 18, 2023, 9:13 PM IST

बच्चू कडू यांची अंबादास दानवेंवर प्रतिक्रिया

नागपूर : आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागेल, असे विधान बच्चू कडू यांनी केलं होतं. बच्चू कडू यांचा बोलविता धनी कोण? असा प्रश्न अंबादास दानवे यांनी विचारत त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. या घडामोडी घडत होत्या त्यावेळी अंबादास दानवे यांचा जन्म देखील झाला नव्हता, ते या विषयात नापास आहेत, अशी तिखट प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. ते नागपूर विमानतळावर पत्रकारांसोबत बोलत होते.

बच्चू कडू यांची दानवेंवर टीका : ज्यावेळी शिवसेनेत घडामोडी घडत होत्या तेव्हा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंसोबत आम्ही एकत्र बसलो होतो. सर्वांत पहिले दोन अपक्ष आमदार होतो की, जे उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभे होते. त्यावेळी अंबादास दानवेंचा जन्म झाला नव्हता, असे बच्चू कडू म्हणाले.

मी नाराज नाही : बच्चू कडू म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार होऊ देऊ नका. आता थेट 2024 मध्येच विस्तार करू आणि बच्चू कडूची भूमिका मजबूत राहील. माझ्या नाराजीचा काहीही संबंध नाही. ती दूर करणारा अजून कोणी निर्माण झाला नाही.

मुख्यमंत्री जेलमध्ये गेले असते? : मुख्यमंत्री जेलमध्ये गेले असते असे विधान आदित्य ठाकरे यांनी केलं होतं. आदित्य ठाकरेंनी आरोप करताना पुराव्यासकट आरोप केला तर बरं झालं असतं. ते कुठल्या कारणासाठी जेलमध्ये गेले असते, हे त्यांनी स्पष्ट करावं, असे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं. या देशात सध्या आरोप करताना पुरावे न देता आरोप केले जात आहे. आरोपांची बातमी झाल्यानंतर विषय दोन दिवसात मागे पडतो. 50 खोक्यांच्या संदर्भातही पुरावे द्यावेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह आम्हाला जेलमध्ये टाकावं, असे ते म्हणाले.

नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये निवडणुका लागतील : सरकारला निवडणुकीला घाबरण्याचं काही काम नाही. सगळ्याच निवडणुका झाल्या पाहिजेत. नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषदेवर प्रशासक आहे. या सगळ्या निवडणुका लागल्या पाहिजे. नोव्हेंबर किंवा डिसेंबरपर्यंत निवडणुका लागतील, असा अंदाज असल्याचं बच्चू कडू म्हणाले. लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप वातावरण तयार व्हायचे आहे. अजून तारीख ठरली नाही, लग्नही जुळलं नाही तर मंगल कार्यालयाचा विषय आला कुठून? तारीख ठरल्यावर आम्ही निर्णय घेऊ, असे मत आमदार बच्चू कडू यांनी मांडलं.

'प्रहार' १५ जागा लढवणार :आगामी विधानसभा निवडणुकीत १५ जागा आम्ही लढू असं बच्चू कडू म्हणाले होते. भाजपाकडून बच्चू कडू यांना सन्मानजनक जागा देऊ असं म्हटलं होतं. यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, सगळ्या दृष्टीने आम्ही विचार करू. प्रत्येकानं आपापलं घर जपायचं असतं. आपलं घर न जपता काम सुरू केलं तर त्याला पक्ष सोडून समाजसेवा करावी लागेल. आम्ही राजकीय पक्ष म्हणून समोर जाणार आहोत.

हेही वाचा:

  1. Rahul Gandhi : ठरलं! राहुल गांधी 'या' मतदारसंघातून लढवणार लोकसभेची निवडणूक
  2. MU Senate Election : सिनेट निवडणुकीवरून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
  3. Nitesh Rane On Senate Election : 'यासाठी' हव्यात सिनेट निवडणुका; नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

ABOUT THE AUTHOR

...view details