नागपूर Legislative council passes Lokayukta Bill : लोकायुक्त विधेयक विधानसभेत मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्याशी फोनवरून संवाद साधून त्याना ही बातमी दिली. यावेळी हे विधेयक संमत केल्याबद्दल अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
अण्णा हजारे यांचं दिल्लीतील आंदोलन होतं चर्चेत : युपीए 2 सरकारच्या कार्यकाळात देशभरात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे एकामागून एक समोर यायला लागल्याने त्यांना आळा घालण्यासाठी जनलोकपाल विधेयक मंजूर करण्याची मागणी पुढे आली. हे विधेयक संसदेत मांडून ते पारित करावे या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आमरण उपोषण केले. अण्णांचे आंदोलन अल्पावधीतच लोकांनी उचलून धरल्याने त्याचे जनआंदोलनात रूपांतर झाले. अखेर जनतेच्या रेट्यामुळे 2014 साली युपीए -2 सरकार कोसळले. केंद्रात लोकपाल प्रमाणेच राज्यातही लोकायुक्त विधेयक मंजूर करण्याची आग्रही मागणी त्यावेळी अण्णांनी केली होती. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करून राज्याच्या विधानसभेत लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यात आले. हे विधेयक मंजूर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देखील या विधेयकाद्वारे लोकयुक्तांच्या कक्षेत आले आहेत.