महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरातील डबल डेकर व्हायाडक्टवर तीन स्टेशनचे बांधकाम, एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद - ब्रेन चाइल्ड प्रकल्प

नागपुरातील डबल डेकर व्हायाडक्टवर ( ouble Decker Viaduct in Nagpur ) तीन स्टेशनचे बांधकाम, एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ( asia book of records ) नोंद झाले आहे. नागपुरातील वर्धा रोडवरील डबल डेकर पुलावर आशियातील सर्वात लांब 3.14 किलोमीटर लांबीचा डबल डेकर मेट्रो पूल उभारण्यात आला आहे. यावर तीन मेट्रो स्टेशन्स बांधण्यात आली आहेत. या बांधकामाची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

ouble Decker Viaduct in Nagpur
ouble Decker Viaduct in Nagpur

By

Published : Dec 4, 2022, 10:32 PM IST

Updated : Dec 4, 2022, 10:45 PM IST

नागपूर : रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी ( Highways Minister Nitin Gadkari ) यांनी ब्रेन चाइल्ड प्रकल्प ( The Brain Child Project ) उभारून इतिहास रचला आहे. आशियातील सर्वात लांब 3.14 किलोमीटर लांबीचा डबल डेकर मेट्रो ब्रिज नागपुरातील वर्धा रोडवर उभारण्यात आला आहे. डबल डेकर पुलावर तीन मेट्रो स्टेशनचे बांधकाम करण्यात आले आहे. महा मेट्रोच्या नावाने एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स ( asia book of records ) तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ( India Book of Records ) या प्रकल्पाची नोंद झाली आहे.

एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून सन्मान - एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून सन्मान मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टीम महा मेट्रो, टीम एनएचएआयचे अभिनंदन केले आहे. नितीन गडकरींनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'आणखी एक विश्वविक्रम नागपुरात केल्याबद्दल टीम महामेट्रो तसेच टीम NHAI चे हार्दिक अभिनंदन. हायवे फ्लायओव्हर, मेट्रो रेल्वेसह सर्वात लांब डबल डेकर पुलाचे ( 3.14 किमी ) लांबीचे बांधकाम सिंगल कॉलम पिअरवर आधारित आहे.

महा मेट्रोसाठी अभिमानाची बाब -मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाला एशिया बुक तसेच इंडिया बुककडून यापूर्वीच पुरस्कार मिळाला आहे. आता हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळणे ही खरोखरच NHAI, महा मेट्रोसाठी अभिमानाची बाब आहे. असे नितीन गडकरी यांनी लिहले आहे. गडकरी पुढे लिहितात की, हा प्रकल्प शक्य करण्यासाठी चोवीस तास काम करणारे अभियंते, अधिकारी, कामगारांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो असे त्यांनी ट्विटमध्ये लिहले आहे. पुढे, नितीन गडकरींनी लिहिले, 'माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे वचन पूर्ण करण्यासाठी हा विकास केला आहे.'

Last Updated : Dec 4, 2022, 10:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details