नागपूर - 'काँग्रेसचे उमेदवार पळकुटे' या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्यक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस यांना निवडणुकीनंतर खऱ्या परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी आमचे सर्व उमेदवार सक्षम असल्याचे ते म्हणाले. ज्या-ज्या वेळी काँग्रेस आता संपेल, अशा वल्गना इतर राजकीय पक्षांकडून झाल्या आहेत, तेव्हा कॉंग्रेस नव्या दमाने उदयास आल्याचे देखील बाळासाहेब थोरात म्हणाले.
खऱ्या परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी आमचे सर्व उमेदवार सक्षम - थोरात - maharashtra assembly election 2019
काँग्रेस पक्ष संपला असे सत्ताधारी म्हणत असले तरी हा पक्ष संपणार नाही. पुन्हा एकदा आम्ही राज्यात येऊ, नागपुरात आम्ही दमदार उमेदवार दिले आहेत. मुख्यमंत्री पार्सल म्हणत असले तरी आमचा उमेदवार त्यांना निवडणुकीच्या रिंगणात दम दाखवेल आणि निवडून येईल.

हेही वाचा -मोदींच्या सभेला दुचाकीवर पाच-पाच जण या, कोणी अडवल्यास माझं नाव सांगा; भाजप नेत्याचे बेताल वक्तव्य
काँग्रेस पक्ष संपला असे सत्ताधारी म्हणत असले तरी हा पक्ष संपणार नाही. पुन्हा एकदा आम्ही राज्यात येऊ, नागपुरात आम्ही दमदार उमेदवार दिले आहेत. मुख्यमंत्री पार्सल म्हणत असले तरी आमचा उमेदवार त्यांना निवडणुकीच्या रिंगणात दम दाखवेल आणि निवडून येईल, वातावरण सरकार विरोधी आहे. जनता त्रस्त आहे, आमचे सगळे उमेदवार जोमाने मैदानात आहेत. त्यामुळे सरकार आमचे येणार हे निश्चित आहे, असेही ते म्हणाले.