नागपूर : केंद्र शासनाने हस्तक्षेप करावा, यासाठी 14 डिसेंबर 2022 रोजी केंद्रीय गृहमंत्र्यांची चर्चा केल्याचे (Maharashtra Karnataka border dispute) मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विधानपरिषदेत ( DCM Devendra Fadvanis in Legislative Council ) सीमावादावर ठराव मांडला. विधानसभेत ठराव वाचन झाल्यानंतर रितसर हा ठराव विधानसभेत मंजूर करण्यात (CM Eknath Shinde moves a resolution) आला. दोन्ही राज्यांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकमत केले असताना एक इंच जमीन न देण्याचा कर्नाटकने 22 डिसेंबर रोजी ठराव केला होता. हे लोकशाही संकेताला धरून नाही. एकाच देशातील दोन राज्यांमध्ये अशा पद्धतीने वाद होणे योग्य नाही, यासाठी हरीश साळवे या ज्येष्ठ वकिलांमार्फत आपण लढा देत आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी (State Assembly) सांगितले.
उद्धव ठाकरेंची ठरावावर प्रतिक्रिया : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादासंदर्भात आजच्या ठरावाला आम्ही पाठिंबा दिला. महाराष्ट्राच्या बाजूने काहीही झाले तरी आम्ही त्याला पाठिंबा देऊ, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. पण काही प्रश्न आहेत. 2 वर्षांहून अधिक काळ, सीमाभागात राहणारे लोक त्यांना महाराष्ट्रात समाविष्ट करण्याची मागणी करत आहेत, आम्ही त्याबद्दल काय करत आहोत, याचे उत्तर मिळाले पाहिजे असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. आज सरकारने उत्तर दिले की, 2008 मध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे वादग्रस्त भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केला जाऊ शकत नाही. म्हणून आपण सुप्रीम कोर्टाकडे जावे आणि सीमाभाग केंद्रशासित म्हणून घोषित करायला सांगावे,अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली.
मुख्यमंत्री बोम्मईंचे मोठे वक्तव्य : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ठरावा प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, कर्नाटकचा एक इंचही भाग महाराष्ट्राला दिला जाणार नाही. कर्नाटक सरकार सीमाभागाचे संरक्षण करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. राज्य पुनर्रचना कायदा 1956 च्या आधारे राज्ये संघटित करण्यात आली आहेत. सीमावादावरील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी असताना देखील महाराष्ट्रातील राजकारणी अशा गोष्टी करत आहेत.
सीमा प्रश्न ठरावाचे वाचन :सीमा प्रश्न ठरावाचे विधानसभेत मुख्यमंत्र्यांकडून वाचन झाले. केंद्र शासनाने हस्तक्षेप करावा यासाठी 14 डिसेंबर 2022 रोजी केंद्रीय गृहमंत्र्यांची चर्चा झाली होती. दोन्ही राज्यांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकमत केले असताना एक इंच जमीन न देण्याचा कर्नाटकने 22 डिसेंबर रोजी ठराव केला होता. हे लोकशाही संकेताला धरून नाही. एकाच देशातील दोन राज्यांमध्ये अशा पद्धतीने वाद होणे योग्य नाही, यासाठी हरीश साळवे या ज्येष्ठ वकिलांमार्फत आपण लढा देत आहोत. असेही मुख्यमंत्र्यांनी (dispute in State Assembly) सांगितले.