नागपूर -नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात 35 संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नागपुरात थंड प्रतिसाद मिळाल्याचे चित्र बघायला मिळाले. शहरातील सर्व दुकाने, ऑफिसेस आणि प्रतिष्ठाने सुरळीत सुरू असल्याने या बंदचा नागपुरात कोणताच प्रभाव दिसून आला नाही.
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नागपुरात थंड प्रतिसाद - वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात ३५ संघटनांनी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या बंदला नागपुरात थंड प्रतिसाद मिळाल्याचे चित्र बघायला मिळाले.
नागरिकत्व सुधारणा कायद्यालच्या विरोधात पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नागपुरात थंड प्रतिसाद
सीएए आणि एनआरसीच्या मुद्यावरून विरोधात केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याचाच एक भाग म्हणून आज वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली राज्यातील 35 संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. विषय गंभीर असल्याने पोलिसांनी देखील सुरक्षेच्या दृष्टीने उपाय-योजना केल्या होत्या. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सर्वांनी शांततेत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. मात्र, नागपूरमध्ये या बंदला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र बघायला मिळाले.