महाराष्ट्र

maharashtra

महाराष्ट्र बचाव आंदोलन : नागपुरातही भाजपकडून शासनाचा निषेध

By

Published : May 22, 2020, 5:35 PM IST

भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज (शुक्रवारी) 'माझं अंगण, माझं रणांगण' अशा प्रकारे घरी राहूनच हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये खासदार डॉ. विकास महात्मे हेदेखील सहभागी झाले. त्यांनी अ‌ॅल्युमिनियमच्या शिडीवर चढून सरकार विरोधात घोषणा दिल्या.

महाराष्ट्र बचाव आंदोलन नागपूर
महाराष्ट्र बचाव आंदोलन नागपूर

नागपूर - राज्य सरकार विरुद्ध भारतीय जनता पक्ष मैदानात उतरला आहे. राज्यभर आज (सोमवारी) भाजपतर्फे निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले. जिल्ह्यातही अनेक ठिकाणी भाजपतर्फे हे आंदोलन करण्यात आले. यात कार्यकर्ते आणि नेत्यांनी त्यांच्या परिसरात निषेध आंदोलन केले.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज (शुक्रवारी) 'माझं अंगण, माझं रणांगण' अशा प्रकारे घरी राहूनच हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये खासदार डॉ. विकास महात्मे हेदेखील सहभागी झाले. त्यांनी अ‌ॅल्युमिनियमच्या शिडीवर चढून सरकार विरोधात घोषणा दिल्या.

महाविकास आघाडी सरकारच्या सतत बदलणाऱ्या चुकीच्या निर्णयांमुळे राज्यातील कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालले आहे, स्थलांतरित कामगारांना दोन वेळचे जेवणही सरकार देऊ शकत नाही, 100 पॉझिटिव्ह रूग्ण कुठे गेले याचा पत्ताच नाही, एखाद्या बॉम्बसारखे ते धोकादायक आहेत. पोलिसांची सुरक्षा, त्यांचे आरोग्य आणि त्यांच्यावर होणारे हल्ले याचा प्रश्न ही गंभीर आहे. पत्रकारांच्याही कोरोना चाचण्या केल्या जात नाहीत, अशा अनेक प्रश्नांवर उपाय शोधण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे, असे म्हणत महात्मे यांनी सरकारचा निषेध नोंदवला.

हेही वाचा -'भाजपसोबत जाऊन आपण महाराष्ट्रद्रोह तर करत नाही ना? जनतेने विचार करावा'

यासोबत भाजप आमदार अनिल सोले, प्रवीण दटके, महापौर संदीप जोशी आणि शहरातील विविध भागात कार्यकर्ते, पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details