नागपूर Maharashtra Assembly Winter Session 2023 :विधिमंडळाच्या सातव्या विदशी ठाकरे गटाचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांच्यावर कारवाई करण्याची भाजपा आमदारांनी विधानसभेत मागणी केली. यावर संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी लावू, असे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
Live updates
- बॉम्बस्फोटातील आरोपींसह ठाकरे गटाचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर होते. त्यांच्यावर कारवाई करा, अशी आशिष शेलार यांनी मागणी केली. त्यांच्यापाठोपाठ भाजपा आमदार नितेश राणे यांनी मागणी केली. सभागृहात बोलताना नितेश राणे यांनी फोटोही दाखविला.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी महादेव ॲप आणि ऑनलाईन बेटिंग ॲप यावरुन चांगलीच चर्चा झाली. यावर महादेव अँप आणि देशविरोधी गुन्हेगार असलेल्या दाऊदशी संबंध असलेल्या अमित शर्मा यांच्या कंपनीला पैसे पुरविणाऱ्या शहा आणि त्यांच्या एडलवाईस कंपनीच्या व्यवहाराची येत्या दोन महिन्यात चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या प्रश्नाला फडणवीस यांनी उत्तर दिलं.
अधिवेशनाच्या सहाव्या दविशी आशिष शेलारांकडून प्रश्न उपस्थित : महादेव ॲपच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात ऑनलाईन अनधिकृत बेटींग करत अनेक बेटींग ॲपच्या निर्मिती केली जात आहे. सामान्य गरीब माणसांची फसवणूक करण्यात येत असून ॲपमधील पैसे बांग्लादेशी नागरिकांचे बनावट भारतीय कागदपत्रे बनवून आर्थिक व्यवहार केले जात असल्याची माहीती आशिष शेलार यांनी सभागृहात दिली. यावर शासनास बुडविल्याप्रकरणी देय असलेला 28 टक्के सेवा व वस्तुकर चुकवल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला असल्याचं सरकारनं सांगितलं. या एफआयआरमधील आरोपी अमीत शर्मा हा मुंबई बॉम्बं स्फोट हल्ल्यातील आरोपी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांचा भाऊ मुस्ताकीन याचा भागीदार आहे. या दोघांवर महादेव ॲप चालवण्याचा आरोप असून विजय जैन यांच्या जे.पी. इन्फ्रा, मुंबईतील बांधकाम व्यावसायिक कंपनीत या दोघांनी पैसे गुंतविलेले आहेत. या कंपनीचं मुंबईत गोरेगाव आणि मिरा रोड इथं काम सरु असून अंडरवर्ल्डचा पैसा बांधकाम व्यावसायात आणला गेल्याचा आरोप आमदार शेलार यांनी केला. अमीत शर्मा आणि विजय जैन यांचा मुंबईत गोरेगाव येथे सुरु असलेल्या जे पी डेक या बांधकाम प्रकल्पाला रशेश शहा यांच्या एडलवाईस या वादग्रस्त फायनान्स कंपनीने 1 हजार कोटी रुपयांचा वित्त पुरवठा केल्याचा आरोपही आमदार शेलार यांनी केलाय.