नागपूरMaharashtra Assembly session day 8 - विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज आठवा दिवस आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले. ललित पाटीलला संरक्षण देणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करा, अशी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मागणी केली आहे.
Live Updates
- सलीम कुत्ता प्रकरणावरून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गदारोळ झाला. एकनाथ खडसे यांनी सलीम कुत्ता याच्याबरोबर असलेले गिरीश महाजन यांचा कथित फोटो दाखविला. सलीम कुत्ता प्रकरणात महाजन यांच नाव घेण्याचा अधिकार नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली. सलीम कुत्ता प्रकरणात एसआयटी चौकशी केल्यास सत्य समोर येईल, असे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितले.
- राज्यातील तरुणांना अमली पदार्थांचे व्यसन लागत आहे. उडता पंजाबसारखी महाराष्ट्राची अवस्था होण्याची स्थिती असल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
- नागपूरमधील सोलार कंपनीत रविवारी झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कंपनीच्या मालकावर ३०२ अन्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. गरिबांनी जगावं की नाही, असा प्रश्न विचारच नाना पटोले यांनी कामगारांच्या प्रश्नांकडं सभागृहाचं लक्ष वेधलं. विधानसभेत विरोधकांकडून निंदा व्यंजक प्रस्ताव येण्याची शक्यता आहेत. विरोधकांकडून मराठा आरक्षण, दूध उत्पादकांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देण्याची शक्यता आहे.