LIVE UPDATES -
- सा.7.20 वा - नितीन गडकरी यांचा विजय झाला आहे. त्यांनी काँग्रेसचे नाना पटोले यांना पराभूत केले.
- दु.५.20 वा - नितीन गडकरी नवव्या फेरीच्या अखेरीस ९४ हजार १११ मतांनी आघाडीवर
- दु. ४.०० वा. - नितीन गडकरी ९८ हजार मतांनी आघाडीवर
- दु. ३.०० वा. - सहाव्या फेरीअंती नितीन गडकरी ८१ हजार मतांनी आघाडीवर
- दु. १.२८ वा. - नितीन गडकरी चौथ्या फेरीच्या अखेरीस ५८ हजार मतांनी आघाडीवर
- स. ११.०४ वा. - दुसऱ्या फेरीत नितीन गडकरी ३३ हजार मतांनी आघाडीवर
- स. १०.०३ वा. - भाजपचे नितीन गडकरी पहिल्या फेरीत १५ हजार ६२२ मतांनी आघाडीवर
- स. ९.२९ - टपाल मतदानामध्ये भाजपचे नितीन गडकरी आघाडीवर
- स. ८.४० - भाजपचे नितीन गडकरी आघाडीवर
- स. ८.२६ वा. - उत्तर नागपूर विधानसभा आणि दक्षिण नागपूर विधानसभा मतारसंघातील प्रत्येकी एका ईव्हीएम मशीनच्या कंट्रोल यूनिटच्या क्रमांकामध्ये तफावत असल्याचा काँग्रेस पक्षाचा आरोप. मतमोजणी प्रक्रिया थांबवण्याची मागणी
- स. ८.०० वा - मतमोजणीला सुरुवात
नागपूर - संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या गडाला खिंडार पाडण्यात काँग्रेस यशस्वी होणार का? याचा फैसला आज होणार आहे. थोड्याच वेळात शहरातील पंडीत जवाहरलाल नेहरू मार्केट यार्ड येथे मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या ठिकाणी भाजपकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रिंगणात होते, तर त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून नाना पटोले यांनी रिंगणात उतरून ही निवडणूक चुरशीची केली. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मनोहर डबरासे यांनी सामन्यात तिहेरी रंगत आणण्याचा प्रयत्न केला असला तरी खरी लढत गडकरी आणि पटोले यांच्यातच होती.
नागपूर लोकसभा मतदारसंघात ११ एप्रिलला मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत ५४.७४ टक्के मतदानाची नोंद करण्यात. २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत हा टक्का २ टक्क्यांनी घटला आहे. मात्र, आता मतदानातील ही घट कुणाच्या पथ्थ्यावर पडणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.