नागपूर - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील सात मतदारसंघांमध्ये ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्याकरिता आज सर्व मतदान पथके मतदान केंद्राकरिता रवाना करण्यात आली आहेत. नागपुरात २ हजार ६५ मतदान केंद्र तयार करण्यात आली आहे. या केद्रांवर मतदान यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता २३ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती राष्ट्रीय कर्तव्याकरिता करण्यात आली आहे.
मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक पथक रवाना, प्रशासन सज्ज - election 2019
साऱ्या देशाचे लक्ष नागपूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे लागलेले आहे. नागपुरात एकूण २१ लाख ६० हजार मतदारांची नोंद झाली आहे. त्यामध्ये १० लाख ९६ हजार पुरुष मतदार आहेत. तर १० लाख ६३ हजार महिला मतदारांची नोंद निवडणूक आयोगाकडे झाली आहे.
साऱ्या देशाचे लक्ष नागपूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे लागलेले आहे. नागपुरात एकूण २१ लाख ६० हजार मतदारांची नोंद झाली आहे. त्यामध्ये १० लाख ९६ हजार पुरुष मतदार आहेत. तर १० लाख ६३ हजार महिला मतदारांची नोंद निवडणूक आयोगाकडे झाली आहे. नागपुरात एकूण २०६५ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहे. मतदानाची प्रक्रिया ११ एप्रिल रोजी पार पडणार असल्याने आज सर्व पोलीस पथके नियोजित मतदान केंद्राकरिता रवाना झाले आहेत. मतदानाचे कार्य हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने प्रत्येक कर्मचारी आणि अधिकारी उत्साही असल्याचे बघायला मिळाले.