नागपूर - तब्बल १२ हजार हॉर्स पॉवर क्षमता असलेले पहिले इलेक्ट्रिक इंजिन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला मिळाले आहे. हे इंजिन 'मेक इन इंडिया' अंतर्गत तयार करण्यात आले आहे. भारत आणि फ्रान्सने मिळून हे महाशक्तीशाली रेल्वे इंजिन तयार केले आहे.
१२ हजार हॉर्स पॉवर क्षमतेचे महाशक्तीशाली इंजिन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात दाखल - १२ हजार हॉर्स पॉवर रेल्वे इंजिन
भारत आणि फ्रान्स रेल्वेने मिळून बिहारमधील मधेपुरा येथे हे 12 हजार हॉर्सपॉवर क्षमतेच्या रेल्वे इंजिनचे उत्पादन केले. हे भारतातील पहिले शक्तीशाली इंजिन आहे. सध्या हे इंजिन ताशी 100 किमी वेगाने धावत आहे. भविष्यात त्याचा वेग 120 किमी इतका वाढवला जाणार आहे.
तब्बल 12 हजार हॉर्सपॉवरचे शक्तीशाली इंजिन असलेल्या मालगाडीची पहिली फेरी आमला ते नागपूरदरम्यान पूर्ण करण्यात आली. भारतीय रेल्वेचे आत्तापर्यंतचे हे सगळ्यात पॉवरफुल इंजिन आहे. त्यामुळे आता शक्तीशाली रेल्वे इंजिन तयार करणाऱ्या देशांमध्ये भारताचा जगात सहावा क्रमांचा लागला आहे. भारत आणि फ्रान्स रेल्वेने मिळून बिहारमधील मधेपुरा येथे हे 12 हजार हॉर्सपॉवर क्षमतेच्या रेल्वे इंजिनचे उत्पादन केले. सध्या हे इंजिन ताशी 100 किमी वेगाने धावत आहे. भविष्यात त्याचा वेग 120 किमी इतका वाढवला जाणार आहे.
अशा प्रकारचे 800 शक्तीशाली इंजिन तयार करण्यात येणार आहेत. त्यापैकी 250 रेल्वे इंजिनची देखभाल नागपुरातील अजनी येथील असलेल्या लोकशेडमध्ये होणार आहे. 2022 फेब्रुवारीपर्यंत या इंजिनांच्या देखभालीसाठी लागणारा डेपो नागपुरात तयार केला जाणार आहे.