महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बेवारस आढळलेली बिबट्याची पिल्ले संगोपनासाठी गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात दाखल - नागपूर बातमी

सलग १५ दिवस त्या शावकांच्या आईचा शोध घेतला. मात्र, ती आलीच नाही. त्यामुळे या चार शावकांच्या संगोपनासाठी त्यांना नागपूर येथील गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात पाठवण्यात आले आहे.

बेवारस आढळलेली बिबट्याची पिल्ले संगोपनासाठी गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात दाखल
बेवारस आढळलेली बिबट्याची पिल्ले संगोपनासाठी गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात दाखल

By

Published : Jul 17, 2020, 11:19 AM IST

नागपूर - शहरातील गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात बिबट्याच्या चार पिल्ल्यांचे आगमन झाले आहे. गेल्या महिन्यात ३० तारखेला अकोला वनविभाग अंतर्गत पातूर वनपरिक्षेत्रामधील पास्टूल येथील मोर्णा नदी पात्रामध्ये बिबट्यांची ४ पिल्ले (शावक) आढळून आले होते. सलग १५ दिवस त्या शावकांच्या आईचा शोध घेतला. मात्र, ती आलीच नाही. त्यामुळे या चार शावकांच्या संगोपनासाठी त्यांना नागपूर येथील गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात पाठवण्यात आले आहे.

बेवारस आढळलेली बिबट्याची पिल्ले संगोपनासाठी गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात दाखल

चारही पिल्लांना शासकीय वाहनाने गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात दाखल करण्यात आले. चारही पिल्लांची तपासणी केली असता, शारीरिक स्थिती समाधानकारक आहे. आईपासून विभक्त झालेल्या ४ शावकांची संगोपनाच्या दृष्टीने काळजी घेतली जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details