नागपूर - उपराजधानी नागपूर शहराला लागून असलेल्या वाडी परिसरात बिबट्याच्या हजेरीने ( Leopard Wandering Wadi Nagpur ) पुन्हा एकादा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी ऑटोमिक एनर्जीडेपोच्या भिंतीवर ( Atomic Energy Depot Wall ) हा बिबट आल्याचे सीसीटीव्हीत दिसून आल्यानंतर चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. कारण येथून अगदी हाकेच्या अंतरावर आंबेडकर नगर ( Ambedkar Nagar ) ही लोकवस्ती आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असलेल्या भागात हा बिबट्या दिसल्याने चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. असे असले तरी हा बिबट्या ज्या भागातून आला होता, त्या जंगल परिसरात पुन्हा निघून गेल्याची खात्री करून वन विभागाने घाबरण्याची काहीही गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. आंबेडकर नगरला लागूनच परमाणू ऊर्जा मंडळाच्या म्हणजेच ॲटॉमिक एनर्जी डेपो असून त्याच डेपोच्या परिसरात भिंतीवर 1 डिसेंबरच्या संध्याकाळी 6 वाजून 33 मिनिटांनी आणि त्यानंतर 6 वाजून 38 मिनिटांना एक बिबट सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसून आला आहे.
- वनविभागाने उचलले 'हे' पाऊल
हा व्हिडिओ समोर येताच वनविभागाने याची संपूर्ण चौकशी करून व्हिडिओ खरा असल्याचा दुजोरा दिला आहे. त्यानंतर वन विभागाकडून खबरदारी म्हणून तत्काळ एसआरपीएफच्या चार नंबरच्या तुकडीला त्या परिसरात पायी फिरून तपासणी केली. ट्रॅप कॅमेऱ्यावरुन सुद्धा ही बाब सत्य असल्याचे दिसून आले. सायंकाळी गस्ती पथकाला जैवविविधता उद्यानाच्या पांढराबोडी भागात हा बिबट प्रत्यक्षात दिसला. त्यामुळे वाडी भागाकडील बिबट्या पांढरा बोडी क्षेत्रात निघून गेल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. हा गस्ती पथक वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष निनावे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाझरी भागाचे राऊंड ऑफिसर एस एफ फुलझेले हे लक्ष ठेवून आहे. या परिस्थितीत नागरिकांना घाबरण्याचे काही कारण नाही, असे आवाहन हिंगणा वनविभागकडून केले जात आहे.
- यापूर्वीही नोंदवला आहे बिबट्याचा वावर