महाराष्ट्र

maharashtra

हिंसक प्राण्यांच्या हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू, पेंच व्याघ्र प्रकल्पातील घटना

By

Published : Apr 29, 2021, 10:31 AM IST

नागपूरातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील पूर्व कुटुंबा क्षेत्रात कक्ष क्रमांक 515 मध्ये 2 वर्षाची मादी बिबट्या मृताअवस्थेत आढळून आला. ही घटना बुधवारी दुपारी गस्तीदरम्यान वन कर्मचाऱ्यांना नजरेस पडली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली. हिंसक प्राण्यांच्या हल्यात बिबट्याचा जखमी होऊन मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

बिबट्या मृतावस्थेत
बिबट्या मृतावस्थेत

नागपूर - पेंच व्याघ्र प्रकल्पातील पूर्व कुटुंब क्षेत्रात कक्ष क्रमांक 515 मध्ये 2 वर्षाची मादी बिबट्या मृताअवस्थेत आढळून आला. ही घटना बुधवारी दुपारी गस्तीदरम्यान वन कर्मचाऱ्यांना नजरेस पडली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली. हिंसक प्राण्यांच्या हल्यात बिबट्याचा जखमी होऊन मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनास्थळी वनविभागाच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यानी पाहणी केली असता, मृत बिबट्याच्या अंगावर हिंसक प्राण्यांच्या हल्ल्याच्या खुणा दिसून आल्यात. यामुळे यातूनच मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. घटनेपासून 1000 मीटरच्या परिघात अन्य प्राण्याच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अस्तित्वाचा तपास वनकर्मचारी घेत आहेत. दरम्यान राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार (SOP) मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर रितसर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक अमलेन्दू पाठक, साह्यक वनसंरक्षक वन्यजीव किरण पाटील, पेंचचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन पातोंड रामटेकचे पशुधन अधिकारी डॉ. दत्ता जाधव समिती, अशासकीय प्रतिनिधी यश दाभोळकर, एनटिसीएचे प्रतिनिधी सहदेव टेकाम उपस्थित होते. सदर घटनेबाबत अधिक तपास वनपाल राजीव मेश्राम तसेच वनरक्षक महेश गायकवाड करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details