हिवाळी अधिवेशन : शिवस्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामागे फक्त मतेच दिसतात - बच्चु कडू - ajit pawar
आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास विधानसभेचे कामकाज सुरू झाले. मात्र, सभागृहात एकही मंत्री नसल्याचे अजित पवार स्वतःच्याच सरकारवर संतापले.
अजित पवार
नागपूर - आज विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. आज जवळपास साडेदहा वाजण्याच्या सुमारास कामकाज सुरू झाले. त्यावेळी एकही मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने अजित पवार संतापले. तसेच सहापैकी एक तरी मंत्री सभागृहात असणे गरजेचे असल्याचे पवार म्हणाले. त्यानंतर १० मिनिटांसाठी कामकाज स्थगित करण्यात आले.
- दु. ३.०७ -शिवस्मारक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची गरज नाही. त्याऐवजी रुग्णालय उभारून त्यांचे नाव द्या, अशी मागणी मी अनेकवेळा केली. मात्र, आमच्या डोक्यात फक्त मते कसे मिळतील? हेच असते. कोणत्या स्मारकामागे किती मते आहेत? हेच आम्ही पाहत असतो.- बच्चु कडू
- दु. २.५० - ओबीसीसाठी स्वतंत्र्य वसतीगृह तयार करावे
- दु. २.४९- विदर्भातील एमआयडीसी ओस पडल्या. नवीन प्रकल्प आणण्याची मागणी
- दु. २.४७ - गडचिरोलीतील सुरजागढ लोहप्रकल्पाचे उद्घाटन होऊन ३ वर्ष झाले. मात्र, अद्यापही सुरू झाला नाही. भिलाई स्टील प्लांटच्या धरतीवर केंद्र सरकारडे प्रस्ताव पाठवा - वडेट्टीवार
- दु. २.४६ - विजय वडेट्टीवार शेतकऱ्यांच्या मुद्दे मांडत आहे. शेतमालाला अधिक भाव देण्याची मागणी
- दु. २.३५ - महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक २०१९ पारित
- दु. २.३४- महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक २०१९ संमतीचा प्रस्ताव - जंयत पाटील
- दु. १२.५० - पुढील महिन्यात मनपा निवडणुका आहेत. त्यामुळे आजच निर्णय घ्यावा - अजित पवार
- दु. १२.४६ -कायद्यामुळे प्रभावित होणार्या मनपा अधिकाऱ्यांशी आणि पदाधिकार्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घ्यावा - पृथ्वीराज चव्हाण
- दु. ११.४४ - विरोधी पक्ष नेते फडणवीस आणि मुनगंटीवार यांच्या मताशी सहमत आहे. काही काळ थांबून चिकित्सा करावी आणि त्यानंतरच निर्णय घ्यावा - पृथ्वीराज चव्हाण
- दु. १२.४२ -भाजप सरकारने मागील काळात महानगरपालिका निवडणुकीमध्ये अपयश मिळाल्यानंतर मनपा कायद्यातील दुरुस्तीचा खेळ केला - पृथ्वीराज चव्हाण
- दु. १२.३०- विधेयकाला सुधीर मुनगंटीवारांचा विरोध. हा कायदा दूरगामी परिणाम करणारा आहे. त्यासाठी संयुक्त चिकित्सा नेमावी. चर्चा न करता कायदा पारित होऊ शकत नाही. जबरदस्तीने हा कायदा मंजूर करू नका, असे मुनगंटीवार म्हणाले.
- दु. १२.२३ -आम्ही सत्तेत असताना हे विधेयक काढले होते. त्यावेळी शिवसेनेचे मंत्री आमच्यासोबत होते. एकमताने निर्णय घेतला होता. आता हे विधेयक बदलण्याचे कारण काय? हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठवून चिकित्सा करण्यात यावी - देवेंद्र फडणवीस
- दु. १२.०७ -महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक 2019 वर विधानसभेत चर्चा
- स. ११.३४ - महापोर्टल स्थगितीचे मी स्वागत करतो. शासनादेश आणि निविदेमध्ये विसंगती आहे. सीसीटीव्हीचे टेप मिळत नाही. वन विभागाची परीक्षेमध्ये उमेदवारांची क्षमता न बघता केवळ लेखी परीक्षेने नियुक्ती दिली. महापोर्टल पूर्णपणे बंद करून सर्व परीक्षांना स्थगिती द्यावी. सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात यावी, आमदार रोहित पवार यांची विधानसभेत औचित्याचा मुद्द्यामार्फत मागणी
- स. ११.१९ - सर्व औचित्याच्या मुद्द्यांच्या नोंदी सरकारकडून घेतल्या जात आहेत. एका महिन्यात संबंधित सदस्यांना त्यांच्या मुद्द्याचे उत्तरे दिले जातील, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश
- स. ११.१८- विधानसभा सदस्यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर संबंधित मंत्र्यांनी त्यासंदर्भात उत्तर दिले पाहिजे, अजित पवार यांची विधानसभेत मागणी
- स. १०.३५ - अखेर १० मिनिटांसाठी विधानसभा सभागृहाचे कामकाज स्थगित
- स. १०.३२ - विरोधकांच्या आरोपावरून अजित पवार आपल्याच सरकारवर संतापले. मंत्रिमंडळाचा विस्तार करू नका, असे कोणी सांगितले होते. सबागृहात एक तरी मंत्री उपस्थित राहणे गरजेचे असल्याचे पवार म्हणाले.
- स. १०.३० - विधानसभेचे कामकाज सुरू
Last Updated : Dec 21, 2019, 3:11 PM IST