नागपूर- विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज (शनिवार) अंतिम दिवस आहे. आठवडाभराच्या या हिवाळी अधिवेशनामध्ये पहिले दोन दिवस सलग गदारोळ पाहायला मिळाला. त्यानंतरचे तीन दिवस सलग उशिरापर्यंत विधीमंडळाचे कामकाज करण्यात आले. आक्रमक असलेल्या विरोधी पक्षाने सलग सहाव्या दिवशी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी रणनिती निश्चित केली आहे.
हेही वाचा -कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरू करा, आमदारांचे मुंख्यमंत्र्यांना निवेदन
राज्यपालांच्या अभिभाषणावरील उत्तर आणि पहिल्या दिवसाच्या पुरवणी मागण्यांच्या उत्तरावर भाजपने सभात्याग केला होता. आजही अंतिम आठवडा आणि विदर्भाच्या प्रश्नावरील चर्चेत भाजप रणनिती वापरणार असल्याचे निश्चित आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिल्याने महाविकास आघाडीच्या आमदारांचा उत्साह वाढला आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या आमदारांनीही शिवस्मारक घोटाळ्यासह इतर विषयांवर भाजपला सडेतोड उत्तर देण्यासाठी प्रतिआक्रमण करण्याचे निश्चित केले आहे.