नागपूर -मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना आता नागपुरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या २४ तासात नागपुरात उपचार घेत असलेले तब्बल ८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यापैकी २८ रुग्णांना गुरुवारी रात्री उशिरा डिस्चार्ज देण्यात आला तर आज मेयो रुग्णालयातून तब्बल ५३ रुग्ण बरे होऊन घरी परतणार आहेत.
दिलासादायक बातमी.. नागपुरात २४ तासात तब्बल ८१ रुग्ण कोरोनामुक्त..
नागपुरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या २४ तासात नागपुरात उपचार घेत असलेले तब्बल ८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.सध्या नागपुरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 332 वर गेली असून त्यापैकी १९० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
या कोरोनामुक्त रुग्णांशिवाय मेडिकलमधून डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची यादी येणे बाकी असल्याने डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्या दोनशेच्या घरात जाण्याची शक्यता आहे. नागपुरातील सर्वात मोठे हॉटस्पॉट असलेल्या सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा या भागात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे. आज डिस्चार्ज होणाऱ्यांमध्ये सुद्धा या भागातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. सध्या नागपुरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 332 वर गेली असून त्यापैकी १९० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर १३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात कोरोनाने चार रुग्ण दगावले आहेत.