नागपूर - गृहमंत्री अनिल देशमुख यांचे गृहनगर असलेल्या नागपुरात गेल्या २४ तासात 2 खुनाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे उपराजधानीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
गेल्या २४ तासात नागपुरात दोघांची हत्या - नागपुरात दोघांची हत्या
गृहमंत्री अनिल देशमुख यांचे गृहनगर असलेल्या नागपुरात गेल्या २४ तासात 2 खुनाच्या घटना घडल्या आहेत.
बुधवारी रात्री यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाची हत्या झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपालनगर परिसरात बाईकवर जाणाऱ्या तरुणावर दुसऱ्या बाईकवर आलेल्यांनी लोखंडी रॉडने हल्ला करत भर रस्त्यात हत्या केली. हत्या झालेल्या तरुणाचे नाव कार्तिक साळवी असे आहे. तो केबल ऑपरेटर म्हणून काम करतो अशी माहिती आहे. चालत्या बाईकवर पाठीमागून आलेल्या हल्लेखोरांनी हल्ला करत हत्या केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. गेल्या एका आठवड्यात फक्त नागपूर शहरातली हत्येची ही पाचवी घटना आहे.