महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर: महिलेने रेल्वे स्थानकावरच दिला मुलीला जन्म

शबाना शब्बो नावाची महिला आपल्या कुटुंबासह प्रवास करत होती. दिल्ली येथून हैदराबादला निघालेल्या शबानाला नागपूर रेल्वे स्थानक येण्यापूर्वी प्रसूती वेदना सुरू झाल्या. नागपूर रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक दोनवर एका महिलेची प्रसूती झाली.

महिलेने रेल्वे स्थानकावरच दिला मुलीला जन्म
महिलेने रेल्वे स्थानकावरच दिला मुलीला जन्म

By

Published : Dec 3, 2019, 11:37 AM IST

नागपूर - रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक दोनवर एका महिलेची प्रसूती झाली. या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. या महिलेचे नाव शबाना शब्बो मुजामिल खान असून ती तेलंगणाच्या नामपल्ली येथील रहिवासी आहे.


शबाना शब्बो नावाची महिला आपल्या कुटुंबासह प्रवास करत होती. दिल्ली येथून हैद्राबादला निघालेल्या शबानाला नागपूर रेल्वे स्थानक येण्यापूर्वी प्रसूती वेदना सुरू झाल्या. शबानाची गाडी नागपूर स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवर गाडी येताच प्रसूती वेदना असह्य झाल्या. त्यामुळे त्या ठिकाणी गस्तीवर असलेल्या आरपीएफ कर्मचाऱ्यांना या संदर्भात माहिती देण्यात आली.

हेही वाचा - एक वर्षाच्या चिमुकल्याचा पाण्याच्या टबमध्ये बुडून मृत्यू


शबानाची स्थिती पाहून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची तयारी सुरू करण्यात आली. या दरम्यान शाबानाने फलाटावरच एका मुलीला जन्म दिला. तो पर्यंत रेल्वेचे अधिकारी डॉक्टरांसह घटनास्थळी दाखल झाले होते. शबानाची प्रसूती सामान्य झाली असून नवजात बालिकेची प्रकृती उत्तम आहे. यानंतर शबानाला उपचारासाठी मेयो रुगणालायत दाखल करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details