नागपूर - मी २० वर्ष महाराष्ट्रात मंत्री म्हणून काम केले आहे. मला प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे गृहमंत्री म्हणून काम करताना मला कोणतीच अडचण येणार नसल्याचे वक्तव्य नवनिर्वाचीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.
'..त्यामुळे गृहमंत्री म्हणून काम करताना अडचण येणार नाही' - प्रशासनाचा अनुभव असल्यानं गृहमंत्री म्हणून चांगले काम करणार
मी २० वर्ष महाराष्ट्रात मंत्री म्हणून काम केले आहे. मला प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे गृहमंत्री म्हणून काम करताना मला कोणतीच अडचण येणार नसल्याचे वक्तव्य नव निर्वाचीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था एक मोठं आव्हान आहे. मात्र, ते योग्य पद्धतीने सांभाळू. शरद पवार यांनी जो विश्वास दाखवला, तो विश्वास सार्थ ठरवणार असल्याचे देशमुख म्हणाले.
आज ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप करण्यात आले. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल देशमुख यांच्यावर गृहमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गृहमंत्रीपदी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी गृहमंत्री म्हणून चांगले काम करणार असल्याची ग्वाही दिली.