नागपूर- विविध विषयांवर आपले मत व्यक्त करताना नेहमीच वाद ओढवून घेणारे माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. सीएए, एनआरसी आणि एनपीआर संदर्भांत संवैधानिक जागर या कार्यक्रमात त्यांनी भाजपवर आणि संघावर गंभीर आरोप करत अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. कोळसे पाटलांनी केलेलल्या वक्तव्यांचा व्हिडीओ ईटीव्ही भारतच्या हाती लागलेला आहे.
माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल; अनेक धक्कादायक खुलासे
माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. सीएए, एनआरसी आणि एनपीआर संदर्भांत संवैधानिक जागर या कार्यक्रमात त्यांनी भाजपवर आणि संघावर गंभीर आरोप करत अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. कोळसे पाटलांनी केलेलल्या वक्तव्यांचा व्हिडीओ ईटीव्ही भारतच्या हाती लागलेला आहे.
नागपूरच्या जाफरनगर भागात 16 फेब्रूवारी रोजी एलायन्स अंगेंस्ट CAA, NRC आणि NPR च्या वतीने संविधान बचाओ सभा आयोजित करण्यात आली होती,त्यामध्ये बोलताना माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी वादग्रस्त विधाने केली आहे. माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर काही आरोप लावलेत. त्याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तालयात तक्रार दाखल केली आहे. या कार्यक्रमाचा व्हिडीओ ईटीव्ही भारतच्या हाती लागला आहे. त्यामध्ये त्यांनी शहिद हेमंत करकरे यांच्या हुतात्मावर गंभीर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत. शहीद हेमंत करकरे यांची हत्या कसाबच्या गोळ्यांनी नाही तर महाराष्ट्र पोलिसांच्या पिस्तूलाने झाल्याचा खळबळजनक आरोप करून नवा वाद निर्माण केला आहे. बी.जे. कोळसे पाटील म्हणाले की हेमंत करकरे यांचा मृत्यू कसाब किंवा इतर कोणत्या ही पाकिस्तानी दहशतवाद्याच्या गोळ्यांनी झाला नाही. तर करकरे यांना महाराष्ट्र पोलिसांच्या पॉईंट नाईन या पिस्तूलाने पाठीमागून गोळ्या घालून ठार करण्यात आले. हे कृत्य मुंबई पोलीस दलातील कोणी हिंदुत्ववादी किंवा मनुवाद्याने केले असावे असे कोळसे पाटील म्हणाले. ते एवढ्यावरच न थांबता पुढे कर्नल पुरोहित यांच्यावरही बोलले. कर्नल पुरोहित यांनी सुरुवातीला मोहन भागवत यांच्या इशाऱ्यावर काम केले. मात्र नंतर तोच कर्नल पुरोहित भागवत यांच्या हत्येचा कट रचत होता. त्याने तशी सुपारी काही शार्प शूटर्सला दिली असल्याचा आरोपही त्यांनी केला..
भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या संदर्भात देखील त्यांनी आक्षेपार्ह विधान करून खळबळ उडवली आहे. अलबिहारी वाजपेयी हे प्रत्येक परदेश दौऱ्यावर महिलांना सोबत न्यायचे, असे त्यांचे हिंदुत्व होते. तसेच अटलबिहारी यांनी बाबरी मशिदीच्या बद्दल सर्वोच्च न्यायालयाला दगा दिला होता. त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोचा आक्रमक झाला असून माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांच्यावर कारवाई व्हावी याकरिता पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार सुद्धा दाखल केली आहे.