महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमृता फडणवीसांना समज द्या..! संघाच्या भैयाजी जोशींना शिवसेना नेत्याचे पत्र - किशोर तिवारी

शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांना अमृता फडणवीस यांची समजूत घालण्यासाठीचे पत्र पाठवले आहे.

amruta fadanvis
अमृता फडणवीस

By

Published : Feb 27, 2020, 9:26 PM IST

Updated : Feb 27, 2020, 10:06 PM IST

नागपूर - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना आवरा, त्यांच्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील संबंध आणखी ताणले जातायत’ अशा आशयाचे पत्र शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांना पाठवले आहे. आदित्य ठाकरे यांना रेशीमकिडा म्हणण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे पत्र लिहिले असून, त्यामध्ये जोशी यांनी अमृता फडणवीस यांची समजूत काढण्याची मागणी केली आहे.

अमृता फडणवीसांना समज द्या..! शिवसेना नेत्याचे सरकार्यवाहक भैयाजी जोशींना पत्र

हेही वाचा -'...अन्यथा तुम्हालाही सहआरोपी करू'; 'अंनिस'चा इशारा

नितीन गडकरी यांच्या सौभाग्यवती कांचन गडकरी यासुद्धा समाजसेवेच्या कार्यात सहभागी असतात. मात्र, त्या चर्चेत राहत नाही. अमित शाह, एकनाथ सिंह यांच्या पत्नीही कधी चर्चेत राहत नाहीत. इतकेच काय तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीदेखील कधी भाजप किंवा काँग्रेस नेत्यांबद्दल चुकीचे बोलत नाहीत. त्यामुळे संघाने अमृता फडणवीस यांना समज द्यावी, असे या पत्रामध्ये तिवारी यांनी लिहिले आहे.

अमृता फडणवीसांना समज द्या..! शिवसेना नेत्याचे सरकार्यवाहक भैयाजी जोशींना पत्र
अमृता फडणवीसांना समज द्या..! शिवसेना नेत्याचे सरकार्यवाहक भैयाजी जोशींना पत्र

हेही वाचा -आज शाळांमध्ये मराठी सक्तीची का करावी लागते?

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस -

‘रेशमी किड्याला आयुष्यातील ‘उपहास’ कधीच समजणार नाही, कारण पूर्वजांनी विणलेल्या सुखासीन ‘रेशमी’ आयुष्याचा उपभोग घेतच त्यांची भरभराट होते. देवेंद्र फडणवीसजी, तुमच्या संघर्षाचा आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचा अभिमान वाटतो’, अशा आशयाचं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंच्या ट्वीटला कोट करत दिलं आहे.

Last Updated : Feb 27, 2020, 10:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details