नागपूर - एका तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला आहे. नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत लष्करीबाग परिसरातील माता मंदिराजवळ ही घटना घडली आहे.
कपिल श्रीकांत बेन (१८) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मुलीच्या वादातून कपिलचा खून झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणात दोनपेक्षा अधिक आरोपी सहभागी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाचपावली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आरोपींच्या संदर्भात पोलिसांना माहिती मिळाली आहे. त्यांना अटक करण्यासाठी पाचपावली पोलीस ठाण्याचे डीबी पथक रवाना करण्यात आले आहे.