नागपूर - भाजपने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यामध्ये खडसे, तावडे, मेहता आणि बावनकुळे यांना उमेदवारी मिळाली नाही. भाजपने खडसेंच्या मुलीला उमेदवारी देऊन नाथाभाऊंना शांत केले. मात्र, कामठी मतदार संघातील तिढा अजूनही सुटलेला नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्नीला भाजपने तिकीट जाहीर केल्याची माहिती होती. मात्र, ज्योती बावनकुळे यांनी बडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. तर भाजपने टेकचंद सावरकर यांना उमेदवारी देत बानकुळेंना धक्का दिला आहे.
कामठीतून चंद्रशेखर बावनकुळेंचा पत्ता कट; टेकचंद सावरकरांना उमेदवारी - kamthi assembly election
भाजपने खडसेंच्या मुलीला उमेदवारी देऊन नाथाभाऊंना शांत केले. मात्र, कामठी मतदार संघातील तिढा अजूनही सुटलेला नाही. चंद्रशेखर बानकुळे यांच्या पत्नीला भाजपने तिकीट जाहीर केल्याची माहिती होती. मात्र, ज्योती बावनकुळे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला.
चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी अखेरपर्यंत जाहीर झाली नव्हती. त्यांना काटोल किंवा त्यांचा पारंपारिक मतदारसंघ कामठी येथून तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. भाजपने चौथ्या यादीत काटोलमधून चरणसिंग ठाकूर यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, कामठी मतदारसंघात कुणालाही उमेदवारी जाहीर केली नाही. त्यामुळे बावनकुळे यांचा पत्ता कट होते की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. मात्र, अखेर भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांना डावलले. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.