नागपूर- सर्वोच्च न्यायालयाकडून सर न्यायाधीशपदी शरद बोबडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ४७ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेले शरद अरविंद बोबडे हे मूळचे नागपूरचे आहेत. नागपूरच्या डॉ. बाबसाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात त्यांनी विधीशिक्षण घेतले. त्यामुळे बोबडे यांची सरन्यायाधीशपदी वर्णी लागल्याने त्यांनी शिक्षण घेतलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी आनंद व्यक्त केला आहे.
सरन्यायाधीश बोबडे यांनी शिक्षण घेतलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या 'या' भावना.... - Justice Bobde Nagpur Connection
न्यायमूर्ती शरद बोबडे यांची सरन्यायाधीशपदी निवड झाली आहे, ही गर्वाची बाब असल्याची भावना डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

शरद बोबडे यांची सर न्यायाधीशपदी निवड झाली आहे, ही गर्वाची बाब असल्याची भावना डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच सरन्यायाधीश शरद बोबडे हे महाविद्यालयीन जीवनात देखील तितकेच प्रभावी होते आणि विद्यालयाच्या उपक्रमात देखील आवर्जून सहभागी व्हायचे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत कोमावार यांनी दिली. सरन्यायाधीश बोबडे हे श्रीकांत कोमावार यांचे मित्र देखील आहेत. त्यामुळे बोबडेंच्या महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देत आपला मित्र सरन्यायाधीश झाल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा-नागपुरात 'आरएसएस'च्या विशेष तृतीय वर्ष वर्गाला सुरुवात