संविधान बदलणे नवरा बदलण्याइतके सोपे नसते, आमदार पुत्राची जीभ घसरली - congress
नागपूर लोकसभा महाआघाडीचे उमेदवार नाना पाटोळे यांच्या प्रचार सभेत जयदीप कवाडे यांनी हे वक्तव्य केले आहे.
नागपूर - स्मृती इराणींना माहित नाही, संविधान बदलणे हे नवरे बदलण्याइतके सोपे नाही. असे वादग्रस्त वक्तव्यविधानपरिषदेचे आमदार जोगेंद्र कवाडे यांचे सुपुत्र जयदीप कवाडे यांनी केले आहे. त्यांनी हे वक्तव्य नागपूरमधीलकाँग्रेसच्या प्रचारादरम्यान केले आहे. या वक्तव्यामुळे कवाडे यांच्यावर टीका होत आहे.
नागपूरमधील बगडगंज भागामध्ये आज काँग्रेस उमेदवार नाना पाटोले यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, उमेदवार नाना पाटोले, जयदीप कवाडे यांच्यासह काँग्रेसचे नेते उपस्थित होते. सभेतून अशोक चव्हाण निघून गेल्यानंतरजयदीप कवाडे यांनी स्मृती इराणी यांच्यावर सडकून टीका केली.
जयदीप कवाडे यांनी स्मृती इराणी यांना माहित नाही की संविधान बदलणे हे नवरे बदलण्याइतके सोपे नाही, यासह इराणी यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका केली. कवाडे यांच्या या विधानामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.