नागपूर -मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि सध्या होमगार्डचे पोलीस महासंचालक असलेल्या परमबीर सिंह यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे. ते नागपूरात बोलत होते. शिवाय या अनुषंगाने लवकरच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
परमबीर सिंह यांनी ठाणे पोलीस आयुक्त असताना एसीपी भीमराव घाडगे हे कल्याणच्या बाजारपेठ पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. यावेळी घाडगे यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून तुरुंगात पाठवल्याचा आरोप करण्यात आला. एसीपी भीमराव घाडगे यांनी त्यासंदर्भात रीतसर तक्रार दाखल केली असून परमबीर सिंह यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा मोडतो. त्यामुळे परमबीर सिंह यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे.
'परमबीर सिंह यांच्यावर अॅट्रोसिटी अंतर्गत कडक कारवाई करा' - नागपूर जोगेंद्र कवाडे
एसीपी भीमराव घाडगे यांनी त्यासंदर्भात रीतसर तक्रार दाखल केली असून परमबीर सिंह यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा मोडतो. त्यामुळे परमबीर सिंह यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे.
जोगेंद्र कवाडे
यात परबीर सिंग यांनी न्यायालयात ॲट्रॉसिटी अंतर्गत केलेला गुन्हा मागे घेण्यात यावे, अशी मागणी याचिकेतून उच्च न्यायालयात केली. या प्रकरणात त्यांना अटक करू नये, असे आदेश न्यायालयाने दिले असून या प्रकरणी सोमवारी 24 मे रोजी सुनावणी होणार आहे. यामुळे न्यायालयांच्या पुढील आदेशनंतर परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होणार की दिलासा मिळणार हे पाहावे लागणार आहे.
Last Updated : May 24, 2021, 12:40 AM IST