नागपूर- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय पक्ष होता. मात्र, वंचित आघाडीची स्थापना करताना प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षालाच बाजूला ठेवले आहे. बाबासाहेबांनी जाती अंताचा लढा दिला. मात्र, प्रकाश आंबेडकर आपल्या उमेदवारांच्या नावासमोर जात लिहीतात. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांपेक्षा मोठे आहेत का? असा प्रश्न पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी उपस्थित केला आहे. ते ईटीव्ही भारतशी बोलत होते.
प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांपेक्षा मोठे आहेत का?
प्रकाश आंबेडकर आपल्या उमेदवारांच्या नावासमोर जात लिहीतात. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांपेक्षा मोठे आहेत का? असा प्रश्न पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी उपस्थित केला आहे.
जोगेंद्र कवाडे, नेते, पीपल्स रिपब्लिकन पार्टी
यावेळी कवाडे म्हणाले, लोकसभेत वंचित आघाडीमुळे कुणाला फायदा झाला? हे जनतेला माहित आहे. रिपब्लिकन पक्ष हा वंचिताचा प्रश्न नाही का? या पक्षात कोण आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सध्या देशातील परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व रिपब्लिकन पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मतही कवाडे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - ...म्हणून चंद्रशेखर बावणकुळे अन् नागपूर महापालिकेविरोधात पोलिसात तक्रार
Last Updated : Sep 29, 2019, 1:43 AM IST